अभिनेत्री कंगना रनौटच्या विरोधात खडक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

पुणे : कसबा ब्लॉक काँग्रेसच्या वतीने अभिनेत्री  कंगना रनौटच्या स्वातंत्र्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधाना विरोधात खडक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. शहिदांचा,स्वातंत्र्य सेनानींचा,देशाचा व राष्ट्रपिता महात्मा गांधींचा जाणुन बुजून त्यांनी अपमान केला असल्याचेही या तक्रारीत म्हटंले आहे. यासाठी अभिनेत्री कंगना रनौटवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कंगना रनौटने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सन १९४७ रोजी आपल्या स्वातंत्र भिक मागुन मिळाले. खरे स्वातंत्र्य सन २०१४ ला मिळाले असे वादग्रस्त वक्तव्य केले काल त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले.  त्या म्हणाल्या भगतसिंगांना फासावर जावे असे गांधीजींना वाटत होते. शहिदांचा,स्वातंत्र्य सेनानींचा,देशाचा व राष्ट्रपिता महात्मा गांधींचा जाणुन बुजून त्यांनी अपमान केला. यासाठी अभिनेत्री कंगना राणावत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई करावी अशी FIR खडक पोलिस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस निताताई रजपुत, ब्लॉक अध्यक्ष प्रवीण करपे, बबलु कोळी, सुरेश कांबळे, गणेश ऊर्फ बंडु शेडगे, संदिप अटपाळकर,सागर सासवडे,कान्होजी जेधे, परवेझ तांबोळी,हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते..

Leave a Reply

%d bloggers like this: