अभाविप चा दोन दिवसीय जिल्हा अभ्यासवर्ग संपन्न

धुळे: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धुळे जिल्ह्याचा दोन दिवसीय जिल्हा अभ्यास वर्ग दि.13 व 14 रोजी उत्साहात संपन्न झाला. अभ्यास वर्गाचे उद्घाटन अभावीप प्रांतसहमंत्री अनिल ठोंबरे, जिल्हाप्रमुख अमोल मराठे, विभाग संयोजक नीलेश हिरे, जिल्हा संयोजक नयन माळी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून संपन्न झाले.

वर्गाच्या सभागृहासाठी दादा पाटील यांचे नाव देण्यात आले होते त्याचबरोबर विद्यार्थी परिषदेच्या वर्षभरातील उपक्रम व कार्यक्रमांची प्रदर्शनी देखील लावण्यात आली होती त्या प्रदर्शनीला बाबुराव वैद्य असे नाव देण्यात आले होते..

या दोन दिवशी अभ्यास वर्गात कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी वेगवेगळ्या सत्रांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये अभाविप कार्यपद्धती, महाविद्यालयीन काम, प्रवास व संपर्क, अभाविप परिचय, भेट मीटिंग आंदोलन सोशल मीडिया प्रेस नोट अशा सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
यासोबतच अभाविप कार्यकर्ते हितचिंतक प्राचार्य प्राध्यापक याचे एकत्रीकरण करण्यात आले या वर्गासाठी जिल्हाभरातून एकूण प्रमुख 60 कार्यकर्ते उपस्थित होते….

Leave a Reply

%d bloggers like this: