अखिल भारतीय खुल्या फिडे क्लासिकल रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत आठव्या फेरीअखेर पुण्याचा आदित्य सामंत आघाडीवर 

पुणे: बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित अखिल भारतीय खुल्या फिडे क्लासिकल रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत आठव्या फेरीत पुण्याच्या फिडे मास्टर आदित्य सामंत याने आपली विजयी मालिका कायम ठेवत 7.5गुणांसह आघाडी कायम राखली आहे.

अश्वमेध हॉल, पुणे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत आठव्या फेरीत पुण्याच्या फिडे मास्टर आदित्य सामंतने गुजरातच्या अनादकत कर्तव्याचा 34 चालींमध्ये पराभव करून विजय मिळवला. 15 वर्षीय आदित्य हा अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम शाळेत 10वी इयत्तेत शिकत आहे. तर, रेल्वेच्या विक्रमादित्य कुलकर्णीने महाराष्ट्राच्या पियुश नर्सिकरचा पराभव करून 7गुण मिळवले. नागपूरच्या फिडे मास्टर सौरव खेर्डेकरने गुजरातच्या विश्रुत पारेखचा पराभव करून 7 गुणांची कमाई केली. महिला ग्रँड मास्टर डब्लूजीएम स्वाती घाटे व अक्षय बोरगावकर यांच्यातील सामना बरोबरीत सुटला.
 
सविस्तर निकाल: आठवी फेरी: व्हाईट व ब्लॅक नुसार:
एफएम आदित्य सामंत(महाराष्ट्र)(7.5गुण)वि.वि.अनादकत कर्तव्या(गुजरात)(6.5गुण);
पियुश नर्सिकर(महाराष्ट्र)(6गुण)पराभूत वि.आयएम विक्रमादित्य कुलकर्णी(रेल्वे)(7गुण)
विश्रुत पारेख(गुजरात)(6गुण)पराभूत वि.एफएम सौरव खेर्डेकर(महाराष्ट्र)(7गुण);
डब्लूजीएम स्वाती घाटे(एलआयसी)(6गुण) बरोबरी वि.अक्षय बोरगावकर(महाराष्ट्र)(6.5गुण)
जयववीर महेंद्रु(महाराष्ट्र)(6गुण) बरोबरी वि.गौरव बाकलीवाल(महाराष्ट्र)(6गुण)
करण त्रिवेदी(गुजरात)(6गुण)बरोबरी वि.सौरभ मेहमाणे(महाराष्ट्र)(6गुण)
अंकित चुडासामा(गुजरात)(6.5गुण)वि.वि.रियान शहा(महाराष्ट्र)(5.5गुण);
विजय चौहान(5गुण) पराभूत वि.ईशान नाडकर्णी(महाराष्ट्र्र)(6गुण);
विरेश शरणार्थी(महाराष्ट्र)(5गुण) पराभूत वि.सिद्धांत ताम्हणकर(महाराष्ट्र)(6गुण);
चिन्मय केळसकर(महाराष्ट्र)(5.5गुण) बरोबरी वि.आरव लखानी(5.5गुण);
निलय कुलकर्णी(महाराष्ट्र)(5गुण)पराभूत वि.ओम लामकाने(महाराष्ट्र)(6गुण);
प्रियांशु पाटील(महाराष्ट्र)(6गुण) वि.वि.अंकेश वशिष्ट(5गुण);
देवम मकवाना(गुजरात)(6गुण) वि.वि.स्वरा लक्ष्मी नायर(5गुण).

Leave a Reply

%d bloggers like this: