पीएमपीएमएलकडून कात्रज ते अभिनव कॉलेज (नऱ्हेगांव) नवीन बस मार्ग सुरू

पुणे : पीएमपीएमएल कडून अटल बससेवा योजनेअंतर्गत मार्ग क्रमांक के १२ – कात्रज ते अभिनव कॉलेज (नऱ्हेगांव) हा नवीन बस मार्ग सुरू करण्यात आला आहे. या बससेवेचे उदघाटन अभिनव कॉलेज (नऱ्हेगांव) येथे आज खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भिमराव तापकीर यांच्या हस्ते बसला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या जयश्री भूमकर व जयश्री पोकळे, भाजप महिला आघाडी पुणे उपशहराध्यक्ष कोमल कुटे, माजी उपसरपंच अक्षय इंगळे, सतिश कुटे, चैत्राली कुटे, सुवर्णा खेडेकर, पंचायत समिती सदस्या ललिता कुटे, तेजस कुटे, बाळासाहेब नवले, दिलीप नवले, अभिनव कॉलेजचे राजीव जगताप, सुनिल वाल्हेकर, सत्यवान भूमकर, सागर भूमकर, शेखर वाल्हेकर, सोपान कुटे, राजू कुटे, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे, कात्रज डेपो मॅनेजर विजय रांजणे, असिस्टंट डेपो मॅनेजर शैलेश जगताप व समीर आत्तार, सीनियर टाईम कीपर प्रकाश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पीएमपीएमएल कडून हि बससेवा सुरू करण्यात आल्यामुळे अभिनव कॉलेज (नऱ्हेगांव) परिसरातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक, नोकरदार, महिला यांच्यासह सर्व नागरीकांना कात्रज ते अभिनव कॉलेज (नऱ्हेगांव) असा प्रवास केवळ ५ रुपयात करता येणार आहे. सध्या या मार्गावर एक बस दर १ तास १० मिनिटांनी धावणार असून दिवसभरात १२ फेऱ्या होणार आहेत.  या बससेवेचा मार्ग कात्रज, दत्तनगर, आंबेगाव, भुमकर नगर, नऱ्हेगाव, झील कॉलेज, श्री कण्ट्रोल चौक, वाल्हेकर चौक, कुटेनगर, अभिनव कॉलेज (नऱ्हेगांव) असा आहे.

यावेळी भिमराव तापकीर म्हणाले, ” पीएमपीएमएलने हक्काची व अत्यंत स्वस्त तिकीटदर असलेली बस सेवा सुरू केल्याने या परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांचा चांगला फायदा होणार आहे. या बस सेवेसाठी सुशांत कुटे यांनी पाठपुरावा केला. खासगी वाहतुकीच्या तुलनेत ही बस सेवा अत्यंत स्वस्त आहे.”

कात्रज डेपो मॅनेजर विजय रांजणे म्हणाले,” पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मिश्रा साहेब, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. केरुरे मॅडम, वाहतूक व्यवस्थापक झेंडे यांनी या परिसरातील मागणीचा विचार करून सदर बससेवा सुरू केली आहे. या बस सेवेला चांगला प्रतिसाद मिळाल्यास या मार्गावर आणखी बसेस वाढविल्या जातील.”

 

Leave a Reply

%d bloggers like this: