महाराष्ट्रात कंगना रनौटच्या चित्रपटावर बंदी घाला – संभाजी ब्रिगेड

भारतीय स्वातंत्र्यासाठी देशभक्तांनी स्वतःचं सांडून 1947 ला स्वातंत्र्य मिळवले आहे. त्याला ही भीक म्हणते व 2014 साली सत्तेवर आलेल्या लोकांनी गोध्रा हत्याकांडात माणसं जाळून मारली, दलितांवर अत्याचार केले, रोहित वेमुला पासून शेतकर्‍यांपर्यंत माणसं चिरडून व ठरवून मारली. नोटबंदी मध्ये रांगेत उभा राहून लोकांचं हत्याकांड केलं. सध्याच्या स्वातंत्र्यात घरगुती गॅस सिलेंडर 950 रुपये ला झाला. पेट्रोल-डिझेल ने 115 रू. पार केली. सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी, कामगार उध्वस्त झाला. हजारों आत्महत्या झाल्या. कोरोना काळात लाखो माणसं जनावरांसारखी मृत्युमुखी पडली. हेच या सरकारचा स्वातंत्र्य आहे का…? म्हणून महाराष्ट्रात कंगना राणावत यांच्या चित्रपटावर आजीवन बंदी घातली पाहिजे. कंगना राणावत ची ही मानसिक मनूवृत्ती आहे. कदाचित कंगना राणावत का डीएनए (DNA) भारतीय नाही.

विकृतीचे साम्राज्य म्हणजे कंगना राणावत…!

कंगना राणावत यांचे भारतातील महिलांनी थोबाड फोडल़ं पाहिजे. त्यांचा मेंदू सडलाय…! ज्या व्यक्तीने देश भिकेला लावला, ज्या व्यक्तीने आणि त्यांच्या सरकारने सर्वसामान्य माणसाचा आयुष्य उध्वस्त केलं अशा व्यक्तीचे प्रसिद्धीसाठी समर्थन करणे म्हणजे सडक्या विचारांची विकृत पेरणी करण्याचा हा प्रकार आहे. केंद्र सरकारची चॕपलूसी करून मिळालेला ‘भिकारीला…’ भारतीय स्वातंत्र्याची किंमत काय कळणार. कंगना राणावत यांच्या सडक्या मेंदूला बाजारात शून्य किंमत आहे.

बालीश, असभ्य व्यक्तीला ‘पद्मश्री’ देणे हा ‘पद्मश्री’ या पुरस्काराचा अपमान आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या प्रत्येक देशभक्ता चा आणि स्वातंत्र्य सैनिकाचा अपमान आहे. म्हणून कंगना राणावत यांच्या ‘देशद्रोही’ वक्तव्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. व केंद्र सरकारने तात्काळ कंगना राणावत यांचा ‘पद्मश्री’ पुरस्कार काढून घेऊन त्यांना अटक करावी… अशी भारतीय म्हणून आमची भावना आहे.

रक्त सांडून 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्याला ‘भीक’ म्हणणे म्हणजे ही देशद्रोही घाणेरडी प्रवृत्ती आहे.

#राष्ट्रप्रथम…

  • संतोष शिंदे,
    प्रदेश संघटक, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र

Leave a Reply

%d bloggers like this: