मिताली राजच्या बायोपिकमध्ये झळकणार मराठमोळी अभिनेत्री तितीक्षा तावडे

सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड सुरू आहे. धावापट्टू मिल्खा सिंह, मेरी कोम, एम एस धोनी, सायना नेहवाल यांच्या बायोपिक नंतर आता  भारतीय महिला क्रिकेट संघांची कर्णधार मिताली राजचा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘शाब्बास मिथू’ असे या बायोपिकचे नाव असून तो 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘शाब्बास मिथू’ या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू ही मितालीची व्यक्तिरेखा साकारत आहे.  या सिनेमाचं दिग्दर्शन राहुल ढोलकिया करत आहे. या चित्रपटात आपली मराठमोळी अभिनेत्री तितीक्षा तावडे झळकणार आहे. तितीक्षा तावडेने इन्स्टाग्रामवर या सिनेमाच्या चित्रीकरणा दरम्यानचे फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. तितिक्षा तावडेने यापूर्वी कलर्स मराठी वरील ‘सरस्वती’ तसेच झी मराठी वाहिनीवरील ‘कन्यादान’ या मालिकांमध्ये काम केले आहे.

 

मिताली राजने 32 टी-20 सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. यात 2012, 2014 आणि 2016 तीन वर्ल्ड कपमध्ये कर्णधार पदाची धुरा सांभाळली आहे. मितालीने 89 टी-20 सामने खेळले आहे. यात तिनं 2364 धावा केल्या आहेत, यात 17 अर्धशतकांचा समावेश आहे. 97 हा मितालीचा टी-20 क्रिकेटमधली सर्वोत्ताम खेळी ठरली आहे. मितालीने 3 सप्टेंबर 2019 मध्ये टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: