शेतकऱ्यांना बी – बियाणे वाटप करून आरती साठे यांचा अभिनव पद्धतीने वाढदिवस साजरा

शेतकऱ्यांनी मानले आभार ,समाजात एक नवा आदर्श दिला 


पुणे : सामाजिक कार्यकर्त्या व बहुजन युवा फाउंडेशनच्या अध्यक्षा आरती साठे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्रापूर, पाबळ परिसरातील गरजू शेतकऱ्यांना विविध पिकांच्या बी व बियाण्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव भुजबळ यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बी बियाणे वाटप करण्यात आले .त्यांनतर शेतकरी व परिसरातील नागरिकांच्या वतीने आरती साठे यांचा नागरी सत्कार करून आभार मानण्यात आले. 

यावेळी जिल्हा सेवादलाचे उपाध्यक्ष संजय गायकवाड ,संतोष शेंडे,सेवा दल सरचिटणीस संतोष पटेकर ,सामाजिक कार्यकर्ते कैलास रुके,अमोल रूके,कैलास घनवट,प्रल्हाद पटेकर,सागर रूनवाल ,रवि  इंगळे,यश चौधरी ,अक्षय घाटगे , सोनु  धुंधव , सदामभाऊ शेख ,दिपक गव्हाणे ,सुशांत दोडके यासह परिसरातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते.

Leave a Reply

%d bloggers like this: