ही तर बनवाबनवी, म्हणूनच दोषारोप होतात पण दोषी कुणीच ठरत नाही : रंगा राचुरे

पुणे:गेले काही दिवस भाजप आणि राष्ट्रवादी कोन्ग्रेस नेते एकमेकांवर विविध आरोप करत पत्रकार परिषद घेत आहेत. अमली पदार्थ , तस्करी , दहशतवादी , स्थानिक दादा , अंडरवल्ड, हफ्ते वसुली , लाच आणि त्यांच्याशी असलेले राजकीय हितसंबंध यातून उघड होत आहेत.

‘मुळात राष्टवादी आणि भाजप , शिवसेना हे प्रस्थापित घुतल्या तांदळासारखे आहेत असे कुणीच म्हणणार नाही. पण महाराष्ट्रात सत्तेत असलेले राष्ट्रवादी – शिवसेना आणि केंद्र सरकारात असलेले भाजप या दोघांच्या हाती मदतीस विविध तपास यंत्रणा आहेत परंतु त्यांच्याकडे जाण्याऐवजी मिडिया ट्रायल करण्यात या सर्व प्रस्थापित पक्षांना रस आहे . नवाब मलिक , देवेंद्र फडणवीस , आशिष शेलार , ही नेतेमंडळी चिखलफेक करताना महाराष्ट्रालाही बदनाम करीत आहेत.’ असे आप चे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांनी म्हंटले आहे.  

वाढते पेट्रोल दर , ग्यास अनुदान , एस टी संप , रोजगार प्रश्न, वाढती व्यसनाधीनता , महिला सुरक्षा, हॉस्पिटल दुर्घटना अश्या अनेक समस्या सामान्य माणसाला भेडसावत असताना ही नूरा कुस्ती खेळण्यामागे जनतेच्या महत्वाच्या प्रश्नावरून लक्ष हटवणे हाच उद्देश आहे. राजकीय पक्षांचे गुंडांशी संबंध आहेतच पण त्यांना एकीकडे अभय देत आव मात्र लढाऊ पणाचा आणण्याने आता जनता फसणार नाही हे यांनी लक्षात घ्यावे. ही सर्व बनवाबनवी असून त्यामुळे दोषारोप होतात पण दोषी कुणीच ठरत नाही.

Leave a Reply

%d bloggers like this: