गुरुवारी पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे : येत्या गुरुवार (दि. 11 नोव्हेंबर) लष्कर जल केंद्र येथील अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कारणास्तव या पंपिंग अख्यात्यारितिल पुणे शहरातील काही भागाचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी  (दि. 12 नोव्हेंबर) साकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. पुणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी ही माहिती दिली आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग
लष्कर जलकेंद्र भाग- लष्कर भाग ,पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेस कोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, मंहदवाडी, काळेपडळ, मुंढवा ,खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी. 

Leave a Reply

%d bloggers like this: