महागाई विरोधातील आंदोलनाची दिशा पक्षाच्या मेळाव्यात ठरवणार-नाना पटोले

पुणे: आम्ही  10-15 दिवसा मध्ये पक्षाचा मेळावा आयोजित केला आहे. त्या मेळाव्या मध्ये केंद्र सरकारने वाढविलेल्या  पेट्रोल-डिझेल व जीवनाश्यक वस्तू महागाई विरोधात येतील पुढील काळात राज्यभर आंदोलन कसे करायचे यांची दिशा या पक्षाच्या मेळाव्या  मध्ये ठरवणार आहोत .अशी माहिती पुण्यात पत्रकारांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

नाना पटोले यांनी आज विविध मुद्यावर भाष्य केले. नाना पटोले म्हणाले,किरिट सोमय्या हे पुढच्या आठवड्यात तीन घोटाळे बाहेर काढणार आहेत. त्यावर नाना पटोले म्हणाले, केंद्र सरकारने वाढवलेली महागाई हे विषय सोडून ते घोटाळे बाहेर काढत आहेत. जनतेची दिशाभूल करत राहण्याचा प्रयत्न करत आहे .असा आरोप नाना पटोले यांनी किरीट सोमय्या वर केला.
केंद्र सरकारने वाढविलेल्या महागाई   पेट्रोल-डिझेल व जीवनाश्यक वस्तू वाढवविल्या आहेत.त्यावर केंद्र सरकार फक्त सामान्य जनतेची लूट करत आहे. आता सामान्य जनतेला पण कळायला लागले आहे. असे नाना पटोले म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यावर नाना पटोले म्हणाले, परिवहन मंत्री अनिल परब यांचे यावर लक्ष आहे. कोणी तरी एसटी कामगार व राज्य सरकार मध्ये आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत.असे नाना पटोले म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: