आज दिवसभरात पुणे शहरात कोरोनाचे नवीन 47 रुग्ण तर 57 रुग्णांना डिस्चार्ज
पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी असून शंभर च्या खाली आज रुग्ण सापडले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 47नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 57रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 5लाख 48हजार 06इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4लाख 95हजार 082इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 0तर पुणेमहापालिका हद्दीबाहेरील 2रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9077जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 647 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
त्यापैकी 104रुग्ण गंभीर आहेत आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 5667 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
