विनोदी कल्ला करण्यास वैभव लोंढे याचे ‘आवरा याला’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस

दिवाळी संपताच आता लगीनघाईला सुरुवात होईल. नव वधूवरांचे भेटणे, नव्या संसाराची सुरुवात यासाठी वधुवर उत्सुक असतील. लग्नाचा सिझन आला की वरातीत वाजणाऱ्या गाण्याकडे रसिकांचे अधिक लक्ष असते. असेच नव वधूवरांचे #पीबीए म्युझिक’ प्रस्तुत आणि निर्माते अँजेला व तेजस भालेराव निर्मित खास ‘आवरा याला’ हे गाणे यंदाच्या वरातीत वऱ्हाडयांना ठेका धरायला लावण्यास सज्ज झाले आहे.
‘आवरा याला’ या गाण्यात गाण्याच्या नावावरूनच नवऱ्या मुलाला लागलेली लगीनघाई आणि लग्नासाठी असलेली त्याची उत्सुकता गाण्याच्या पोस्टरवरूनच पाहायला मिळतेय. या गाण्याला गीतकार, संगीतकार आणि गायक म्हणून वैभव लोंढे याची उत्तम साथ लाभली आहे. या तीनही महत्वपूर्ण भूमिका सांभाळत त्याने या गाण्यात अभिनय ही साकारला आहे. या गाण्यात वैभव सह अभिनेत्री मानसी सुरवसे, प्रियांका जाधव, अभिनेता राहुल चव्हाण, तुषार खैर, अभिजीत थोरात हे कलाकार झळकणार आहेत. राहुल आणि मानसीची जोडी या गाण्यात नव वधू वराच्या भूमिकेत दिसणार आहे.
‘आवरा याला’ हे गाणे प्रेक्षकांना नक्कीच थिरकायला लावणार असून या गाण्याचा आस्वाद घेण्यासाठी ‘पीबीए म्युझिक’ या युट्युब चॅनेल ला तुम्हाला भेट द्यावी लागेल. नुकतेच हे गाणे गाणप्रेमींच्या भेटीस आले असून विनोदी कल्ला आणि हास्याची कारंजे उडविणारे हे गाणे प्रेक्षकांना पाहणे रंजक ठरणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: