हाॅटेल इंडस्ट्री नवीन पिढीच्या संशोधनामुळे नव्या उंचीवर जाईल -आमदार रोहित पवार

पुणेः- कोणताही व्यवसाय पारंपरिक पद्धतीने चालविण्या पेक्षा त्या व्यवसायात पुढील पिढी नव संशोधनात्मक दृष्टीकोन घेऊन उतरत असेत तर त्याचे स्वागत झाले पाहिजे. तरुणांच्या याच संशोधन वृत्तीमुळे हाॅटेल इंडस्ट्री नव्या उंचीवर जाईल असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.

जंजिरा रेस्टाॅरंट या वर्षी राैप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. त्या निमित्त हाॅटेल व्यवसायात उत्कृष्ट शेफ म्हणून काम करणारे शेफ सचिन जोशी आणि शेफ सिमरण बिंद्रा यांना आमदार रोहित पवार यांच्या हस्ते यंदाचा जंजिरा आदर्श शेफ पुरस्कार-2021 देऊन गाैरविण्यात आले त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विलास चोरगे,चेतन चोरगे,अनिकेत चोरगे,शेफ सचिन जोशी शेफ सिमरण बिंद्रा,सुनील महाजन आणि सचिन ईटकर, महाराष्ट्र केटरींग असोसिएशनचे अध्यक्ष आणि पूना गेस्टचे किशोर सरपोतदार उपस्थित होते.

आमदार रोहित पवार म्हणाले, आता तुम्ही जेवण कसे बनवतात याच बरोबरीने ते कसे सादर करतात याला देखील खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच नागरिक आरोग्याबाबत जागृत झाल्याने त्यांना आपण जे पदार्थ देणार आहोत ते पदार्थ त्याची मूळ चव राखत त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कसे योग्य आहे हे समजावून सांगता आले पाहिजे. हाॅटेल इंडस्ट्री ही रोजगार निर्माण करणारी सर्वात मोठी इंडस्ट्री पैकी एक आहे. या इंडस्ट्रीशी विकासात अनेक गतिरोधक आहेत.पंरतू हे गतिरोधक पार करतांना हॉटेल इंडस्ट्री सभोवताली गुंफलेली इंडस्ट्री देखील कशी विकसित होईल याचा सामाईक विचार होणे गरजेचे आहे. या स्पर्धेच्या युगात आपआपल्या इंडस्ट्रीज पुरता विचार करुन भागणार नाही.

शेफ सचिन जोशी आणि शेफ सिमरण बिंद्रा यांनी देखील यावेळी थोडक्यात मनोगत व्यक्त केले.

विलास चोरगे यांनी प्रास्ताविक केले.सुनील महाजन यांनी सुत्रसंचलन केले तर सचिन ईटकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: