जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांचे पाहणी करावी अन्यथा संभाजी ब्रिगेड च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे तिव्र आंदोलन


पुणे:मुख्यमंत्री यांना विनंती आहे त्यांनी अहमदनगर येथील रुग्णालयातील आगीच्या घटनेतील जखमींना दहा लाख आणि मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना पन्नास लाखाची मदत जाहीर करावी, तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे ऑडिट झाले पाहिजे, ही संभाजी ब्रिगेड ची प्रामुख्याने मागणी आहे,पुणे जिल्हाधिकाऱ्यांना संभाजी ब्रिगेड च्या वतीने एक वर्षा पूर्वी जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयाची पाहणी करून माहिती घ्यावी तसेच ऑडिट करावे, यासाठी निवेदन दिले आहे,तरीही त्याच्यावर काहीच निर्णय जिल्हा प्रशासनाकडून झाला नाही .हा यांचा निष्काळजीपणाच म्हणावा लागेल.
रुण्यालयांची वेळीच ऑडिट करून माहिती घेतली तर घडणारा अनर्थ टाळता येईल, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या पंधरा दिवसांत जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांचे ऑडिट करून पाहणी करावी अन्यथा संभाजी ब्रिगेड च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे तिव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी दिला.

Leave a Reply

%d bloggers like this: