लावणी कलावंतांना कार्यक्रमासाठी सर्वतोपरी मदत करणार – चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

पुणे :  कोरोनाच्या संकटाचा ज्या ज्या घटकांना फटका बसला अश्या सर्वांना त्यांच्या त्यांच्या व्यवसायात पुन्हा उभे राहण्यास मदत करण्याचे धोरण मी व भाजप च्या सर्वच कार्यकर्त्यांनी अवलंबिले असून त्याच धर्तीवर लावणी कलावंतांना कार्यक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत  पाटील म्हणाले.

भाऊबीजेनिमित्त क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या माध्यमातून आज यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे लावणी कलावंत भगिनींना साडी भेट देण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर, सत्यजित धांडेकर,नगरसेविका हर्षाली माथवड,वासंती  जाधव, वृषली चौधरी,  मिताली सावळेकर,  पुनीत जोशी,  दिनेश माथवड,नवनाथ जाधव,दीपक पवार दुष्यन्त मोहोळ इ मान्यवर उपस्थित होते.


यावेळी बोलताना पाटील म्हणाले की ” कोरोना काळात रोजगार बुडाल्याने पुन्हा उभे राहताना जे भांडवल लागते ते पुरविण्याचा आम्ही निर्णय केला आणि त्यासाठी रिक्षा चालक यांना सी एन जी कुपन, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्यांच्या खात्यात दरमहा ठराविक रक्कम, बचत गटाने तयार केलेल्या वस्तू विकत घेण्याचा उपक्रम, महिलांना शिलाई मशीन भेट देऊन त्यांना कपडे शिवण्याचे काम देखील दिले असे सांगतानाच,त्याच धर्तीवर लावणी कलावंतांना त्यांचा शो सुरु करण्यासाठी सर्वतोपरी मदत करताना एका शो ची सर्व तिकिटे आम्ही खरेदी करू व मानधन देखील देऊ,त्या माध्यमातून त्यांचे पुढील शो साठी चे भांडवल उभे राहिल असे वचन ही चंद्रकांतदादा यांनी दिले.

पुरुष असून ही स्त्री वेषातली लावणी सादर करणारे फिरोज मुजावर यांना विशेष सन्मानित करण्यात आले. माझ्या फाउंडेशन च्या वतीने नवरात्र, गणेशोत्सव, शिवजयंती सोहोळा साजरा केला जातो, त्यात दरवर्षी दर्जेदार लावणीचे कार्यक्रम केले जातात, मात्र गत दोन वर्षात हे कार्यक्रम झाले नाहीत म्हणून लावणी कलावंतांना भाऊबीज निमित्त भेट देण्याचा उपक्रम राबविल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.
यावेळी लावणी कलावंत तेजस्विनी लोकरे,स्वाती धोकटे,शीतल चोपडे, शबनम महिमकर, पूजा नाईक, शिल्पा भवार,निकिता शाह, उषा करंबळेकर, सीमा पटेल, दीपा मातवड,रुपाली लोंढे, माधवी गवंडे इ भगिनींना साडी भेट देण्यात आली.मला भाऊ नाहीये त्यामुळे आज आमदार चंद्रकांतदादा पाटील आणि संदीपभाऊ खर्डेकर यांनी जी भाऊबीज भेट दिली ती कायम स्मरणात राहील असे नृत्यांगना तेजस्विनी लोकरे म्हणाल्या.

 

Leave a Reply

%d bloggers like this: