fbpx

देवीदेवतांच्या रांगोळ्या  आणि  २१०० दिव्यांच्या सोनेरी प्रकाशाने  उजळली  चतु:शृंगी 

पुणे : विविध रंगातून साकारलेले देवी सरस्वतीचे स्वरुप….15 बाय 10 आकारात काढलेली कोल्हापूरची देवी महालक्ष्मी…रांगोळीतून रेखाटलेले गजानन आणि देवदेवतांचे स्वरुप त्यासोबच २१०० दिव्यांच्या सोनेरी प्रकाशाने संपूर्ण चतु:शृंगी मंदीर उजळून निघाले. राष्ट्रीय कला अकादमी आणि चतु:शृंगी देवस्थान यांच्या वतीने देवस्थान परिसरात रांगोळ््या आणि दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

दिपोत्सवामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी राष्ट्रीय कला अकादमीचे संचालक रोमा लांडे, अतुल सोनावणे, अमर लांडे, गणेश माने, गौरव निविलकर, प्रतीक पानसरे, पूनम नर्तेकर, सुप्रिया मुरमुरे, दिनेश चव्हाण, राजेश निकम, जयंत मोने उपस्थित होते.  उपक्रमाचे यंदा २० वे वर्ष आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: