पुढील तीन दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा

पुणे:सध्या लक्षद्विप आणि दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. हवेच्या कमी दाबाचं हे क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच लक्षद्विप आणि कर्नाटक किनारपट्टी परिसरात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून महाराष्ट्रात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. पुढील तीन दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

आज सकाळपासूनचं मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, घाट परिसर, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. येत्या काही तासांत संबंधित जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. शुक्रवारी सायंकाळी राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा आणि नाशिक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: