fbpx

सर्वपक्षीय इच्छुकांनी महापालिकेच्या निवडणूकीची तयारी केली सुरू

पुणे:पुणे महानगरपालिकेची आगामी  निवडणूक जवळ आल्याने यावर्षीच्या दिवाळीत राजकीय पक्षाच्या दिवाळी फराळाचे पेव फुटले आहे. सर्वच राजकीय पक्षातील इच्छुकांची दिवाळी फराळाची लगबग सुरू असून मतदारांचाही उत्साही प्रतिसाद आहे.

पुणे महानगरपालिकची निवडणूक येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. तीन सदस्यांचा प्रभाग निश्‍चित झाला असून दिवाळी संपताच प्रभाग रचनेचे काम सुरू होणार आहे.त्यामुळे अनेक इच्छुकांनी लोकसंपर्काची तयारी केली आहे. दिवाळी फराळ हा त्या लोकसंपर्काच्या प्रयत्नांचा भाग आहे.

पुणे महानगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने यावर्षीच्या दिवाळीत राजकीय पक्षाच्या दिवाळी फराळाचे पेव फुटले आहे. सर्वच राजकीय पक्षातील इच्छुकांची दिवाळी फराळाची लगबग सुरू असून मतदारांचाही उत्साही प्रतिसाद आहे.
पुण्यात लढताना महाविकास आघाडीतील तीन्ही पक्ष एकत्रित लढणार आहेत. त्यामुळे आघाडीतील प्रत्येक पक्षाला या इच्छुकांचा सामना करावा लागणार असून यातून बंडखोरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दिवाळी फराळानिमित्त तयार झालेल्या इच्छुकांच्या संख्येवरूत तशी शक्यता अधिक वाटत आहे.महाविकास आघाडीचा सामना भारतीय जनता पार्टीबरोबर होणार आहे, भाजपा महापालिकेत सत्तेत आहे. भाजपाला पुन्हा सत्तेत यायचे आहे तर काहीही करून महाआघाडीला सत्ता खेचून आणयाची आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: