गजराज ग्रुप ट्रस्टच्या वतीने “आनंदाची दिवाळी” या उपक्रमा अंतर्गत दिवाळी साजरी

पुणे : आज भारत २१ व्या शतकात पोहोचला आहे. विश्व गुरु म्हणुन आपण जगभरात नावाजत आहोत.समाजाला मानसिक गुलामगिरीतून मुक्त करणार्‍या विश्व वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता पण आज कित्येक गड किल्ल्यांच्या घेर्‍यात डोंगर दर्‍यात असे अनेक गावे वसली आहेत कि जी शहरापासून जवळ तर आहेत पण खूपच दुर्लक्षीत आहेत. तिकोना किल्ल्याच्या जवळ असणाऱ्या आंधळे गावाची पांढेरपूर नावाची एक साधारण आठ घरांची धनगर वस्ती. वाडी आंधळे गावाच्या मागे असणाऱ्या डोंगरावर आहे. गावापासून साधारण दिड तास खडी चढण चढून या वाडीत जावे लागते. जिथे ना पंच्याहत्तर वर्षात वीज पोहोचली ना लालपरी .. तेथील लोक महाराजांचा आदर्श मानणारी हरहुन्नरी… म्हणुन निसर्गाला न ओरबडता .. जंगलातून गरजेपुरता उत्पन्न घेणारी. अश्या या दुर्गम धनगरवाडी वर पुण्यातील गजराज ग्रुप ट्रस्ट यांच्या वतीने “आनंदाची दिवाळी” या उपक्रमा अंतर्गत दिवाळी साजरी करण्यात आली.

रात्री धनगरवाडी वर प्रत्येक घरात पणत्या लावण्यात आल्या. त्या नंतर सर्वांन सोबत फटाके वाजवण्यात आले. या कार्यक्रमा अंतर्गत धनगरवाड्यावर सौरदिवे, लहान मुले, पुरुष व महिलांना नवीन कपडे, ब्लॅंकेट, दिवाळी फराळ तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. गजराज परिवारातर्फे मागील ५ वर्षांपासून गडकिल्यांच्या जवळ असणाऱ्या आदिवासी, धनगर वाड्यांवर दिवाळी अश्या प्रकारे साजरी करण्यात येते.

Leave a Reply

%d bloggers like this: