पत्रकार, लेखक गिरीश अवघडे यांना ‘बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

पुणे :  ऑल इंडिया जर्नलिस्ट फ्रेंड्स असोसिएशनचा यावर्षीचा ‘बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ पत्रकार व लेखक  गिरीश पंढरीनाथ अवघडे यांना जाहिर करण्यात येत आहे. अशी माहिती ऑल इंडिया जर्नलिस्ट फ्रेंड्स असोसिएशनचे अध्यक्ष यासिन पटेल यांनी दिली.  

पत्रकारितेला प्रबोधनात्मक विचारांची बैठक असणाऱ्या मोजक्या पत्रकारांमध्ये त्यांचा समावेश होतो. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचा सुक्ष्म अभ्यास व साध्या व आशयघन शब्दांमध्ये लिखाण ही त्यांची बलस्थाने आहेत.त्यांचे अनेक लेख आजवर प्रकाशित झाले आहेत. याशिवाय ‘पावसातला सह्याद्री शरद पवार’ या पुस्तकाचे ते सहसंपादक आहेत. त्यांचे ‘अस्वस्थ नोंदी’ हे पुस्तक देखील लवकरच प्रकाशित होत आहे. प्रिंट, टिव्ही आणि डिजिटल अशा माध्यमातून त्यांनी बहुआयामी पत्रकारिता केली आहे. त्यांना गौरवान्वित करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. अंत्री,जि. अकोला येथे दि. १४ ते १५ नोव्हेंबर रोजी हा पुरस्कार त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल. असेही यासिन पटेल यांनी सांगितले. 

Leave a Reply

%d bloggers like this: