सोनालीकाने ऑक्टोबर २०२१ मध्ये ५.५ टक्‍के वाढ नोंदवत १७,१३० ट्रॅक्टर्सची विक्री केली

पुणे  : भारतामध्ये सणासुदीचा उत्साह दिसतो आहे आणि या काळात शेतक-यांच्या वाहतूक व शेतीसंबंधीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सोनालिका ट्रॅक्टर्स आपल्या संपूर्ण क्षमतेनिशी सरसावली आहे. भारताच्या सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या ट्रॅक्टर ब्रॅण्डसपैकी एक असलेल्या आणि देशातील क्रमांक एकचा निर्यातदार ब्रॅण्ड अशी ओळख मिळविणा-या सोनालिका ट्रॅक्टर्सच्या शेतक-यांना केंद्रस्थानी ठेवणा-यात्यांच्या विशिष्ट गरजांनुसार निर्माण केल्या जाणा-या ट्रॅक्टर्सच्या श्रेणीला यंदाच्या सणासुदीच्या मोसमात पुन्हा एकदा ग्राहकांचा सर्वोत्तम प्रतिसाद लाभला आहे, ही कंपनीसाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. सोनालिकाने आर्थिक वर्ष २२ मध्ये आजच्या तारखेपर्यंत एकूण ८५,०६८ ट्रॅक्टर्सची विक्री केली असून६.५६ टक्‍क्‍यांची वाढ नोंदवली आहे.

कंपनीची ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. गेल्या वर्षी याच काळामध्ये कंपनीचे ७९,८२९ ट्रॅक्टर्स विकले गेले होते. देशातील शेतकरी शेतीच्या यांत्रिकीकरणासाठीच्या उपाययोजनांवर भर देत असतानासोनालिकाने ऑक्टोबर २१ मध्ये एकूण १७,१३० ट्रॅक्टर्सची विक्री करून ५.५ टक्‍के वाढ नोंदवली आहे व उद्योगक्षेत्राच्या वाढीच्या दरालाही  मागे टाकले आहे. शेतीच्या यांत्रिकीकरणाला पाठबळ देण्यासाठी आणि शेतक-यांना परवडू शकेल अशा पद्धतीने आणि शेतक-यांना परवडू शकेल अशा पद्धतीने त्यांना भरभराटीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी सोनालिकाने बहुआयामी दृष्टीकोन अंगिकारला आहे.

यात उत्पादनामध्ये नाविन्यपूर्ण बदल करणे, वेगवेगळ्या राज्यांच्या विशिष्ट गरजांनुसार काम करणारे ट्रॅक्टर्स पुरविणेआपली सेवा अधिकाधिक प्रमाणात ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नव्या श्रेणी आणि बाजारपेठा यांचा शोध घेणे – योग्य वेळीयोग्य ठिकाणीयोग्य दृष्टीकोन बाळगणे या सर्व गोष्टींमुळे आपल्या ग्राहकांना प्रगत शेती उपाययोजना पुरविण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांना वेग मिळाला आहे. भारतीय उत्पादकांपैकी सोनालिका ही कंपनीच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर आपले वर्चस्व राखून आहे व या बाजारपेठेमध्ये तिचा हिस्सा २५ टक्‍के इतका आहे.

सोनालिका ट्रॅक्टर्सचे एक्झेक्युटिव्ह डायरेक्टर रमण मित्तल म्हणाले की सणासुदीच्या काळातच शेतकरी आपल्याजवळील ट्रॅक्टर्सच्या बदल्यातआपल्या शेतीच्या उत्पादकतेत तसेच उत्पन्नात वाढ करू शकेल अशाप्रकारे अधिक प्रगत ट्रॅक्टर घेण्यास तयार असतात. सोनालिकाच्या हेवी ड्युटी उत्पादनश्रेणीवर शेतक-यांनी ठेवलेल्या विश्वासाच्या जोरावरच कंपनीने आपल्या इथवरच्या अतुलनीय प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे,  

Leave a Reply

%d bloggers like this: