केंद्र सरकारकडून पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात; पेट्रोल 5 तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त

लोकसभा, विधानसभा पोटनिवडणुकीत बसलेल्या झटक्याने मोदी सरकारला जाग 

नवी दिल्ली : दिवाळी मध्ये सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  केंद्र सरकारने आता पेट्रोल-डिझेलच्या दरात कपाती केली आहे. आता पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त झाले असून डिझेलच्या दरात १० रुपयांची कपाती करण्यात आली आहे. विविध राज्यात झालेल्या लोकसभा, विधानसभा पोटनिवडणुकीत बसलेल्या झटक्याने मोदी सरकारला जाग आली आणि केंद्र सरकारने करात  कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होताना पाहिले. तसेच काही दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहिल्याचे पाहिले आहे. पण दिवाळीच्या पूर्वसंध्येवर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा केली आहे. उद्या म्हणजेच गुरुवारपासून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे ५ रुपये आणि १० रुपयांनी कमी होणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पेट्रोलच्या तुलनेत डिझेलच्या उत्पादन शुल्कात दुप्पट कपाती झाली आहे. आगामी रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांपासून जनतेला दिलासा देणारी ही बातमी आहे. 

देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल ११० रुपये प्रति लीटर पार गेले आहे. दररोज पेट्रोल ३५ पैशांनी वाढत आहे. ४ ऑक्टोबर २०२१ पासून २५ ऑक्टोबरपर्यंत पेट्रोलच्या दरात सरासरी आठ रुपयांनी वाढ झाली.

Leave a Reply

%d bloggers like this: