पुणे शहरामध्ये कोरोनाचे नवीन 98 रुग्ण
पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी असून शंभर च्या खाली आज रुग्ण सापडले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 98नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 69रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 5लाख 44हजार 95इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4लाख 94हजार 732इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 4रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 3तर पुणेमहापालिका हद्दीबाहेरील 1रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9076जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 687रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 94रुग्ण गंभीर आहेत आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 5269 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
