सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या मंचावर उज्वल निकम आणि गायिका महालक्ष्मी अय्यर

सारेगमप लिटिल चॅम्प्स हा तमाम महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा आणि संगीत प्रेमींचा अगदी लाडका कार्यक्रम आहे. त्यातील सर्व निरागस स्पर्धकांइतकाच गोड त्यांचा परफॉर्मन्स असतो. फक्त परीक्षक आणि प्रेक्षकच नाही तर मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार देखील या छोट्या गायकांचे फॅन झाले आहेत. प्रत्येक आठवड्यात हे लिटिल चॅम्प्स आपल्या भन्नाट परफॉर्मन्सने सगळ्यांना थक्क करतात. यातील काही स्पर्धकांनी या मंचाला निरोपही दिला. या आठवड्यात दिवाळी विशेष भागात या स्पर्धकांचं कौतुक करण्यासाठी मंचावर सज्ज होणार आहेत लोकप्रिय गायिका महालक्ष्मी अय्यर आणि निष्णात वकील उज्वल निकम. उज्वल निकम यांनी या सर्व स्पर्धकांच्या गाण्याचा आनंद लुटला. इतकंच नव्हे तर या मंचावर आल्यावर महालक्ष्मी अय्यर यांना देखील गाण्याचा मोह आवरला नाही त्यामुळे महालक्ष्मी यांच्या आवाजातील सुमधुर गाणं देखील प्रेक्षकांना या आठवड्यात ऐकायला मिळेल.
यांच्या उपस्थितीत सगळे लिटिल चॅम्प्स खूप धमाल करणार आहेत. सर्व लिटिल चॅम्प्सने एकमेकांनी आधी सादर केलेली गाणी गायली. त्यामुळे हे स्पर्धक वेगळ्या स्पर्धकांनी आधी सादर केलेली गाणी कशी गाणार? या आठवड्यात कोण एलिमिनेट होणार आणि कोणाला मिळणार गोल्डन तिकीट हे प्रेक्षकांना आगामी भागात कळेल.

Leave a Reply

%d bloggers like this: