दिवाळी साजरी करताना पर्यावरणाचा विचार होणे गरजेचे – प्रसाद घळसासी

पुणे : दिवाळी हा सण आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे, दु:खाकडून आनंदाकडे, अनीतीकडून नीतीकडे, दुष्कृत्याकडून सतकृत्याकडे, आळसाकडून उद्योगीपणाकडे, अंधश्रद्धेकडून विज्ञानाकडे, अनारोग्याकडून आरोग्याकडे, अस्वच्छतेकडून स्वच्छतेकडे नेणारा हा सण आहे. परंतु आज आपण ज्या तऱ्हेने हा सण साजरा करीत आहोत, ते पाहिले तर त्याचे प्रमुखपण आपण नष्ट करीत आहोत. दिवाळीमध्ये प्रामुख्याने फटाक्याचा कचरा ज्यामध्ये कागदी आणि फटाक्यांमधील न जळालेला रासायनिक कचरा कायम दुर्लक्षीत राहिला आहे. इतर कच-याबरोबर हा एकत्र झाल्यावर त्याचे परिणाम पर्यावरणावर होत आहे. फटाक्यामधील रसायने अर्धवट जळाल्यावर त्याची घातकता जास्त आहे. आकाशकंदील व लाईटच्या माळा यांचे नीट व्यवस्थापन झाले तर त्याचे पर्यावरणपुरक उपयोग होऊ शकत असल्याचे मत कचरा व्यवस्थापन सल्लागार प्रसाद घळसासी यांनी व्यक्त केले.

माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पर्यावरणपुरक दिपावली व वेस्ट मॅनेजमेंट चर्चसत्राचे आयोजन माय अर्थ फांउडेशनतर्फे महानगरपालिकेच्या इंद्रधनुष्य सभागृहामध्ये करण्यात आले होते. यावेळी जेष्ट पर्यावरणतज्ञ ललित राठी यांच्या वाढदिवसानिमित्त ललित दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माय अर्थ फांउडेशनचे अध्यक्ष अनंत घरत, महाएनजीओ फेडरेशनचे संचालक तसेच समग्रनदी परिवाराचे ट्रस्टी मुकुंद शिंदे, पुणे महानगरपालिका पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, जलदेवता अभियानाचे शैलेंद्र पटेल, प्रसाद घळसासी, आश्विनी यादव, किशोर कांबळे, सागर ढावरे, पतित पावन संघटनेचे योगेश वाडेकर, अक्षय शिंदे, राजेश शेलार, संजय साळवी उपस्थित होते. पर्यावरण रक्षणाची शपथ यावेळी उपस्थितीतांकडून घेण्यात आली.

फटाक्यांमुळे होणारे वायु व ध्वनीप्रदुषण टाळून पर्यावरण जपायचे असेल तर आपल्या आनंदाच्या कल्पाना काहिश्या बदलून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणे गरजेचे असल्याचे मत पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांनी व्यक्त केले.

काळानूरुप कानठळ्या बसणा-या आवाजाने व मोठय़ा प्रमाणात धूर निर्माण करणारे फटाके फोडून आवाज व वायूचे प्रदूषण होत आहे. या फटाक्यांमुळे आपणाला आनंद मिळतो, पण दुस-यांचे काय याचा आपण विचार करत नाही. माणसांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊन रक्तदाब, मानसिक ताण, निद्रानाश इत्यादी आजारांना माणूस बळी पडतो. आजारी व्यक्ती, वृद्ध, लहान मुले व गर्भवती महिला यांना मुख्यत्वे या प्रदूषणाचा त्रास होऊन समाजस्वास्थ बिघडत आहे. पशुपक्ष्यांचा बळी जाऊन नैसर्गिक जैविक साखळी तुटत आहे. एकंदरीत मोठय़ा प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास होऊन निसर्गाचे कालचक्र बिघडल्याचे आपण अनुभवत आहोत. म्हणून आपल्या प्रवृत्तीत बदल करणे आवश्यक असल्याचे महाएनजीओ फेडरेशनचे संचालक मुकुंद शिंदे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

%d bloggers like this: