ज्येष्ठ व्हॉयलिन वादक प्रभाकर जोग यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ व्हॉयलिन वादक प्रभाकर जोग यांचे आज सकाळी 8 वाजता येथे निधन झाले आहे. ते 89 वर्षांचे होते.

गाणारं व्हॉयलिन कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हॉयलिन वादनाला त्यांनी लोकप्रियता मिळवून दिली. गदिमांच्या गीतरामायणातील अनेक प्रसंग जोग यांनी आपल्या व्हायोलिनच्या सुरावटींमधून जिवंत केले. त्यांच्या व्हायोलिनचे सूर आजही अनेकांच्या मनात रुंजी घालतात. संगीतकार सुधीर फडके यांचे सूर आणि त्यांना व्हायोलिनद्वारे साथसंगत करणारे प्रभाकर जोग अशी अनोखी पर्वणी कित्येक पिढ्यांसाठी राहिली आहे.  व्हायोलिनवादनाच्या माध्यमातून त्यांनी तब्बल 6 दशकं संगितक्षेत्राची सेवा केली. त्यांना 2017 साली गदिमा पुरस्कार, 2015 साली गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मिळाला होता.

गाणारे व्हायोलिन आता मूक झाले  

व्हायोलिनला गायला लावणारा, शब्दांपलिकडे जाऊन त्यातून आर्त आणि हळव्या भावना व्यक्त करण्याची किमया साधणारा संगीत क्षेत्रातील एक सच्चा साधक आपण गमावला आहे. संगीत क्षेत्रातील सच्चा साधक कसा असावा याचे प्रभाकर जोग आदर्श होते. यापुढे संगीत क्षेत्राला त्यांचे गाणारे व्हायोलिन आणि त्यांचे मार्गदर्शन यांची उणीव भासत राहील असे सांगून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

Leave a Reply

%d bloggers like this: