विद्यार्थी, सनदी लेखापालांसाठी ‘आयसीएआय’तर्फे दोन दिवसीय बॉक्स क्रिकेट टूर्नामेंटचे उद्घाटन

पुणे : विद्यार्थी व सनदी लेखापालांसाठी दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखा आणि विद्यार्थी शाखा (विकासा) यांच्यातर्फे आर्चर्स वेल्थच्या सहकार्याने आयोजित दोन दिवसीय बॉक्स क्रिकेट टूर्नामेंटचे उद्घाटन शनिवारी झाले. सेंट्रल मॉलमध्ये आयोजित या स्पर्धेवेळी ‘आयसीएआय पुणे’चे अध्यक्ष व खजिनदार सीए समीर लड्डा, उपाध्यक्ष व सचिव सीए काशिनाथ पाठारे, सीए सर्वेश जोशी, सीए अमृता कुलकर्णी, सीए अमोल चंगेडिया, सीए योगेश पोद्दार, सीए सुमित शहा आदी उपस्थित होते.
 
दोन दिवसांच्या या टूर्नामेंटमध्ये एकूण १३ संघ सहभागी झाले आहेत. तीन गटात हे सामने होणार असून, पहिल्या दिवशी १२, तर दुसऱ्या ८ साखळी सामने खेळवले जातील. त्यानंतर दोन उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम फेरी खेळवली जाईल. बी-स्मार्ट, केपीएसजी नाईट रायडर्स, एसबीएच स्मॅचर्स, एसपीसीएम स्ट्रायकर्स, प्रास, स्पे वॉरियर्स, आर्चर्स रायजिंग बुल्स, पी अँड एस ००७, महारथी, यंग वॉरियर्स, फडके बॉईज, खराडी टायगर्स, पुणेरी केसरी असे एकूण १३ संघ यामध्ये सहभागी झाले आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: