Saturday, April 18, 2026
BusinessLatest News

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्सच्या करोत्तर नफ्यात ३४.६ टक्क्यांची वाढ; आर्थिक वर्ष २०२६ मध्ये १,६०० कोटी रुपयांची कमाई

  • आर्थिक वर्ष २०२६ मध्ये करोत्तर नफ्यात वार्षिक ३४.६ टक्‍के वाढ होऊन १,६०० कोटी रुपयांवर पोहोचला.
  • आर्थिक वर्ष २०२६ मध्ये व्हीएनबीमध्ये वार्षिक १०.९ टक्‍के वाढ होऊन २,६२९ कोटी रुपये झाला आहेतसेच नफा क्षमता (मार्जिन) २४.७ टक्‍के राहिली आहे.
  • ३१ मार्च २०२६ पर्यंत कंपनीचे एकूण विमा संरक्षण (In-force sum assured) ४६.११ लाख कोटी रुपये इतके होते.
  • आर्थिक वर्ष २०२६ मध्ये किरकोळ नवीन व्यवसाय विमा रक्‍कम वार्षिक ३५.३ टक्क्यांनी वाढून ४.५० लाख कोटी रुपये झाली आहे.
  •  आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीत रिटेल प्रोटेक्शन एपीएमध्ये वार्षिक ६०.५ टक्क्यांची वाढ झाली.
  • आर्थिक वर्ष २०२६ साठी प्रति शेअर १.६५ रुपये अंतिम लाभांश प्रस्तावित करण्यात आला आहे.

मुंबई : आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या संचालक मंडळाने ३१ मार्च २०२६ रोजी समाप्‍त झालेल्‍या वर्षाचे आर्थिक निकाल मंजूर केले आहेत.

या निकालांबाबत मत व्‍यक्त करत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ श्री. अनुप बागची म्हणाले, “आर्थिक वर्ष २०२६ हे आमच्यासाठी एक ऐतिहासिक वर्ष आहे, कारण आम्ही २० कोटींहून अधिक ग्राहकांना विश्वास आणि वचनबद्धतेने दिलेल्या २५ वर्षांच्या सेवेचा सोहळा साजरा करत आहोत. ३१ मार्च २०२६ पर्यंत एकूण जीवन विमा संरक्षणाचे मूल्य ४६.११ लाख कोटी रुपये इतके आहे, ज्‍यामधून गेल्या काही वर्षांमध्ये आमच्या ग्राहकांनी आमच्यावर ठेवलेला दृढ विश्वास दिसून येतो.

आमच्या ग्राहकांच्या मूल्यांप्रती असलेली बांधिलकी आणि लवचिक कार्यपद्धतीमुळे, आम्ही या वर्षातील आव्हानात्मक जागतिक मॅक्रो वातावरणाचा यशस्वीपणे सामना केला. आमच्या कंपनीच्या करोत्तर नफ्यामध्‍ये (पीएटी) वार्षिक ३४.६ टक्क्यांची मजबूत वाढ होऊन तो १,६०० कोटी रुपये झाला आहे. न्यू बिझनेस व्हॅल्यूमध्ये (व्‍हीएनबी) वार्षिक १०.९ टक्क्यांची वाढ होऊन २,६२९ कोटी रुपये झाली आहे, तसेच नफा क्षमता २४.७ टक्‍के राहिली आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपनीची एम्बेडेड व्हॅल्यू वार्षिक १०.५ टक्क्यांनी वाढून ५२,९८९ कोटी रुपये झाली आहे.

सप्टेंबर २०२५ मधील अलीकडील ० टक्‍के जीएसटी सुधारणेमुळे विमा पॉलिसी अधिक परवडणाऱ्या झाल्या आहेत आणि आमच्या रिटेल प्रोटेक्शन विभागाने आर्थिक वर्ष २०२६ च्या दुसऱ्या सहामाहीत ५०.९ टक्क्यांची प्रबळ वार्षिक वाढ नोंदवली आहे. परिणामी, किरकोळ नवीन व्यवसाय विमा रक्‍कमेने आर्थिक वर्ष २०२६ च्या दुसऱ्या सहामाहीत ४९.५ टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली आणि आर्थिक वर्ष २०२६ अखेर ४.५ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

उत्पादन रचनेतील नवोपक्रमावर भर दिल्याने आम्हाला ग्राहकांच्या विविध गरजा अधिक प्रभावीपणे पूर्ण करणे शक्य झाले आहे. आम्ही अलीकडेच आयसीआयसीआय प्रु ग्लोबल वेल्थ मल्टिप्लायर लाँच केले आहे, जे गिफ्ट सिटी आराखड्यांतर्गत अमेरिकन डॉलरमध्ये व्यवहार करणारे उत्पादन असून जागतिक स्तरावरील फंडांमध्ये गुंतवणूक आणि जीवन विमा संरक्षण प्रदान करते. यासोबतच आम्ही आयसीआयसीआय प्रु स्मार्ट किड ३६० ही मुलांसाठीची एक शाश्वत बचत योजना सुरू केली आहे, जी लवचिक पे-आउट्स, अचिव्हमेंट रिवॉर्ड्स आणि प्रीमियम वेव्हरच्या (विमा हप्ता माफी) माध्यमातून मुलांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे सुरक्षित करते; यामुळे ग्राहक त्यांच्या गैरहजेरीतही आपल्या मुलांची भविष्यातील उद्दिष्टे सुरक्षित करू शकतात.

आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम मूल्य प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये आमचे क्लेम सेटलमेंट रेशो (विमा दावा निपटारा प्रमाण) ९९.३ टक्‍के राहिले असून, हे दावे निकाली काढण्यासाठी सरासरी १.१ दिवस लागला आहे. संकटकाळात आमच्या ग्राहकांच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे हे निदर्शन आहे. कार्यक्षमता सुधारण्यासाठी आम्ही इकॉनॉमीज ऑफ स्केल, तंत्रज्ञान आणि डिजिटल सोल्यूशन्सचा सातत्याने वापर करत आहोत, ज्यामुळे आमच्या सेव्हिंग कॉस्ट-टू-प्रीमियम गुणोत्तरात ४० बेसिस पॉइंट्सची (बीपीएस) घट झाली असून आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ते १२.१ टक्‍के राहिले आहे.

गेल्या २५ वर्षांत आम्हाला अनेक पिढ्यांतील ग्राहकांना सेवा देण्याचे भाग्य लाभले आहे. आम्हाला मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर आम्ही भविष्यासाठी सज्ज असलेली संस्था उभारण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत, जी विचारपूर्वक बदल स्वीकारेल, चपळाईने कृती करेल आणि विम्याची व्याप्ती वाढवून अर्थपूर्ण प्रभाव निर्माण करेल. विम्याच्या सुलभ उपलब्धतेचा विस्तार करून सर्व भागधारकांना दीर्घकालीन शाश्वत मूल्य प्रदान करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”

कामगिरीची ठळक वैशिष्ट्ये:

  • प्रीमियम: नवीन व्यवसायातून प्राप्त प्रीमियममध्ये वार्षिक ३०.६ टक्क्यांची वाढ होऊन आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीतील ७,४४४ कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीत ९,७१९ कोटी रुपयांवर पोहोचला. आर्थिक वर्ष २०२५ मधील २२,५८३ कोटी रुपयांच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२६ मध्ये नवीन व्यवसायातून प्राप्त प्रीमियम वार्षिक ९.९ टक्क्यांनी वाढून २४,८१० कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष २०२६ साठी अॅन्युअलाइज्ड प्रीमियम इक्विव्हॅलंट (एपीई) १०,६४१ कोटी रुपये राहिला. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये एकूण प्रोटेक्शन एपीईमध्ये वार्षिक १६.४ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.

किरकोळ संरक्षण एपीई आर्थिक वर्ष २०२५ मधील ५९८ कोटी रुपयांवरून वार्षिक ३२.३ टक्क्यांनी वाढून आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ७९१ कोटी रुपये झाला. विशेष म्हणजे, आर्थिक वर्ष २०२६ च्या दुसऱ्या सहामाहीत यात ५०.९ टक्क्यांची जोरदार वार्षिक वाढ दिसून आली, ज्यामध्ये सप्टेंबर २०२५ नंतर जीएसटीमध्ये झालेल्या कपातीचाही वाटा आहे.

  • विमा संरक्षण रक्‍कमकिरकोळ नवीन व्यवसायातील विमा संरक्षण रकमेत आर्थिक वर्ष २०२६ च्या दुसऱ्या सहामाहीत वार्षिक ४९.५ टक्क्यांची मोठी वाढ होऊन  आर्थिक वर्ष २०२६ अखेर ४.५० लाख कोटी रुपयांवर पोहोचली.

३१ मार्च २०२५ रोजीच्या ३९.४३ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत ३१ मार्च २०२६ पर्यंत कंपनीच्या ग्राहकांनी घेतलेले एकूण सक्रिय विमा संरक्षण मूल्य १६.९ टक्क्यांनी वाढून ४६.११ लाख कोटी रुपये झाले आहे.

  • खर्च: बचत व्यवसायातील खर्च-ते-प्रीमियम गुणोत्तर ४० बेसिस पॉइंट्सनी कमी झाले आहेजे आर्थिक वर्ष २०२५ मधील १२.५ टक्क्यांवरून आर्थिक वर्ष २०२६ मध्ये १२.१ टक्‍के झाले आहे. खर्चाच्या गुणोत्तरात झालेली ही घट गेल्या दोन वर्षांत राबवण्यात आलेल्या विविध खर्च बचतीच्या उपक्रमांचा परिणाम आहेजेणेकरून खर्चाची रचना सध्याच्या उत्पादनांच्या मिश्रणाशी सुसंगत होईल. २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू झालेल्या इनपुट टॅक्स क्रेडिटच्या अनुपलब्धतेचा विचार करूनही ही खर्च कपात साध्य झाली आहे. आर्थिक वर्ष २०२६ साठी एकूण खर्च-ते-प्रीमियम गुणोत्तर १८.२ टक्‍के राहिले असून मागील वर्षाच्या पातळीवर स्थिर आहे.
  • नफा क्षमताकंपनीचा करोत्तर नफा (पीएटी) वार्षिक ५७.८ टक्क्यांनी वाढून आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीतील ३८६ कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीत ६०९ कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष २०२५ मधील १,१८९ कोटी रुपयांच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२६ मध्ये करनंतरचा नफा वार्षिक ३४.६ टक्क्यांनी वाढून १,६०० कोटी रुपये झाला. याचे मुख्य कारण म्हणजे भागधारकांच्या निधीतून प्राप्त झालेले उच्च गुंतवणूक उत्पन्न होय. यामध्ये आयसीआयसीआय पेन्शन फंड मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडमधील (पूर्वीची आयसीआयसीआय प्रुडेन्शियल पेन्शन फंड्स मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड) १०० टक्‍के इक्विटी भागभांडवलाच्या विक्रीतून मिळालेल्या ११४ कोटी रुपयांच्या नफ्याचा समावेश आहे. ही विक्री प्रक्रिया वगळताआर्थिक वर्ष २०२६ मध्ये करानंतरचा नफा वार्षिक २५.० टक्क्यांनी वाढला आहे.

आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीत न्यू बिझनेस व्हॅल्यू (व्‍हीएनबी) ९६५ कोटी रुपये राहिली. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये व्हीएनबी वार्षिक १०.९ टक्क्यांनी वाढून २,६२९ कोटी रुपयांवर पोहोचली असून नफा क्षमता (मार्जिन) २४.७ टक्‍के राहिली आहे.

  • विमा दावा निपटारा प्रमाण: आर्थिक वर्ष २०२६ मध्ये चौकशी न लागलेल्या वैयक्तिक मृत्यू दाव्यांचे निपटारा प्रमाण ९९.३ टक्‍के राहिले आहे आणि हे दावे निकाली काढण्यासाठी सरासरी १.१ दिवस लागले आहेत.
  • सातत्‍यताआर्थिक वर्ष २०२६ मध्ये १३ व्या महिन्याची आणि ४९ व्या महिन्याची सातत्‍यता अनुक्रमे ८४.५ टक्‍के आणि ७१.८ टक्‍के राहिली आहे.
  • सॉल्व्हन्सी रेशो१५० टक्‍क्‍यांच्या नियामक आवश्यकतेच्या तुलनेत ३१ मार्च २०२६ पर्यंत कंपनीचा सॉल्व्हन्सी रेशो २२७.३ टक्‍के इतका भक्कम राहिला आहे.
  • लाभांश: आर्थिक वर्ष २०२६ साठी प्रति इक्विटी शेअर १.६५ रुपये अंतिम लाभांश प्रस्तावित करण्यात आला आहे.
  • व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता (एयूएम): ३१ मार्च २०२६ पर्यंत कंपनीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता ३.१४ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
  • एम्बेडेड व्हॅल्यू (ईव्‍ही): ३१ मार्च २०२६ पर्यंत एम्बेडेड व्हॅल्यू १०.५ टक्क्यांनी वाढून ५२,९८९ कोटी रुपये झाली आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये एम्बेडेड व्हॅल्यूवरील परतावा (आरओईव्‍ही११.९ टक्‍के राहिलातर ईव्ही ऑपरेटिंग प्रॉफिट ५,७०२ कोटी रुपये नोंदवण्यात आले.
  • ईएसजीप्रमुख जागतिक आणि भारतीय ईएसजी रेटिंग एजन्सीनुसारकंपनीने भारतीय जीवन विमा उद्योगात आपले सर्वोच्च स्थान (रँकिंग) कायम राखले आहे.

आर्थिक निकष:

कोटी रूपये आर्थिक वर्ष २०२५ आर्थिक वर्ष २०२६ वार्षिक वाढ
करोत्तर नफा (पीएटी) ,१८९ ,६०० ३४.६ टक्‍के
नवीन व्‍यवसायाचे मूल्‍य (व्‍हीएनबी) ,३७० ,६२९ १०.९ टक्‍के
व्‍हीएनबी मार्जिन २२.८ टक्‍के २४.७ टक्‍के १९० बीपीएस
एकूण प्रीमियम ४८,९५१ ५३,१२५ .५ टक्‍के
अॅन्युअलाइज्ड प्रीमियम इक्विव्हॅलंट  (एपीई) १०,४०७ १०,६४१ .२ टक्‍के
·       बचत अ‍ॅन्यूइटीसह ,७६९ ,७३५ (.४ टक्‍के)
·       संरक्षण ,६३८ ,९०६ १६.४ टक्‍के
उत्पादन मिश्रण (एपीईचे टक्‍के): लिंक्ड / नॉनलिंक्ड / अ‍ॅन्यूइटी / प्रोटेक्शन / ग्रुप फंड्स ४९/२१//१६/ ४८/२०//१८/
वितरण चॅनेल मिश्रण (एपीईचे टक्‍के): एजन्सी / थेट / बँका / पार्टनरशिप डिस्ट्रिब्युशन /ग्रुप ३०/१४/२९/११/१६ २५/१४/३०/१३/१८
रिटेल नवीन व्यवसाय विमा रक्‍कम (लाख कोटी रूपये) .३२ .५० ३५.३ टक्‍के
नवीन व्यवसाय विमा रक्‍कम (लाख कोटी रूपये) ११.९४ १४.५० २१.४ टक्‍के
एकूण सक्रिय विमा संरक्षण रक्‍कम ३९.४३ ४६.११ १६.९ टक्‍के
खर्च/एकूण प्रीमियम¹ १८.१ टक्‍के १८.२ टक्‍के १० बीपीएस
खर्च / एकूण प्रीमियम (बचत व्यवसाय)¹ १२.५ टक्‍के १२.१ टक्‍के (४० बीपीएस)
सॉल्व्हन्सी २१२.२ टक्‍के २२७.३ टक्‍के १५.१ टक्‍के
व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) (लाख कोटी रूपये) .०९ .१४ .४ टक्‍के
एम्‍बेडेड व्‍हॅल्‍यू (ईव्‍ही)  ४७,९५१ ५२,९८९ १०.५ टक्‍के

टिप:

आकडेवारीची राउंडिंग ऑफ (पूर्णांकात रूपांतर) केल्यामुळे घटकांचे एकूण बेरीज जुळणार नाही.

१: उप-कर्जावरील व्याज वगळून कमिशनसह एकूण खर्च / एकूण प्रीमियम

व्याख्यासंक्षेप आणि स्पष्टीकरणात्मक टिपा

  • अॅन्युअलाइज्ड प्रीमियम इक्विव्हॅलंट (एपीई): एपीई हे जीवन विमा कंपनीने केलेल्या नवीन व्यवसायाचे एक मोजमाप आहे. याची गणना कंपनीने कोणत्याही कालावधीत नवीन किरकोळ आणि ग्रुप ग्राहकांकडून मिळवलेल्या नियमित प्रीमियम पॉलिसींवरील वार्षिक पहिल्या वर्षाचा प्रीमियम आणि सिंगल प्रीमियमच्या दहा टक्‍के रक्‍कम यांची बेरीज करून केली जाते.
  • रिटेल वेटेड रिसीव्हड प्रीमियम (आरडब्‍ल्‍यूआरपी): आरडब्ल्यूआरपी हे किरकोळ (ज्याला वैयक्तिक व्यवसाय देखील म्हटले जाते) व्यवसायासाठी एपीईसारखेच एक नवीन व्यवसायाचे मोजमाप आहे. यातील एकमेव फरक असा आहे कीयेथे विचारात घेतलेले नियमित प्रीमियम हे विमा कंपनीला प्रत्यक्षात प्राप्त झालेले पहिल्या वर्षाचे प्रीमियम असतातते वार्षिक नसतात. हे एका कालावधीत प्राप्त झालेले सर्व किरकोळ पहिल्या वर्षाचे प्रीमियम आणि किरकोळ सिंगल प्रीमियमच्या दहा टक्‍के रक्‍कम यांची बेरीज असते.
  • सातत्‍यता: हा व्यवसायाच्या गुणवत्तेचा सर्वात सामान्य मापदंड आहे. ज्या किरकोळ पॉलिसींमध्ये प्रीमियम येणे अपेक्षित आहेत्यापैकी किती टक्‍के पॉलिसीधारक प्रीमियम भरणे सुरू ठेवतातहे यावरून समजते. नियमित आणि मर्यादित वेतन सातत्‍यता ही १४ जून २०२४ रोजीच्या आयआरडीएआय मास्टर सर्कुलर ऑन सबमिशन ऑफ रिटर्न्स २०२४ नुसार मोजली जाते.
  • खर्च गुणोत्तरखर्च गुणोत्तर हे कंपनीच्या खर्चाच्या कार्यक्षमतेचे मोजमाप आहे. कंपनीने नवीन व्यवसायावर केलेला खर्च तसेच नूतनीकरण प्रीमियमवरझालेला खर्च (उप-कर्जावरील व्याज वगळून) आणि एकूण प्रीमियम यांचे गुणोत्तर म्हणून याची गणना केली जाते.
  • एम्बेडेड व्हॅल्यू (ईव्‍ही): एम्बेडेड व्हॅल्यू म्हणजे व्यवसायातील एकूण जोखमींसाठी पुरेशी तरतूद केल्यानंतरव्यवसायासाठी वाटप केलेल्या मालमत्तेतून मिळणाऱ्या आणि वितरित करण्यायोग्य उत्पन्नातील भागधारकांच्या हिताचे वर्तमान मूल्य होय.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading