fbpx

सिद्धेश्वर महाविद्यालय येथे अभाविपची दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठक संपन्न

माजलगाव: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र प्रदेशाची प्रदेश कार्यकारिणी ची दोन दिवसीय बैठक श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय, माजलगाव याठिकाणी दिनांक २९ व ३० ऑक्टोबर रोजी संपन्न झाली. बैठकीचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा.सारंग जोशी, प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे व प्रदेश संघटनमंत्री अभिजीत पाटील यांनी दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करुन केले.

या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ज्यामध्ये सामाजिक सद्यस्थिती, शैक्षणिक सद्यस्थिती या विषयावर चिंतन व्यक्त करून आगामी काळात यावर काय उपाययोजना करता येतील व अभाविप म्हणून आपली भूमिका काय असेल यावर सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली. ‘परिषद की पाठशाला’ हा उपक्रम येणाऱ्या काळात प्रकल्प म्हणून अभाविपच्या मध्यमातून चालविला जाईल अशी चर्चा या बैठकीत करण्यात आली. संघटनात्मक दृष्टीकोनातून संघटन वाढीसाठी कार्यकर्ता विकास, संघटन कौशल्य या विषयांवर सत्र झाले. माहिती व तंत्रज्ञानाचा दैनंदिन जीवनात उपयोग , विद्यापीठ व महाविद्यालय शाखा कार्य, शैक्षणिक खर्चाचे अंदाज पत्रक देखील यावेळी सादर करण्यात आले.सदर बैठकीत अभाविपने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्याचा निर्धार या बैठकीत केला.

या शैक्षणिक वर्षांमध्ये अभाविप दोन लाख विद्यार्थ्यांची सदस्यता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात करणार आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव दिन अभाविप संपूर्ण राज्यात उत्साहात साजरा करणार हा ही संकल्प यावेळेस करण्यात आला. यासंदर्भातील योजने विषयी प्रदेश मंत्री  सिद्धेश्वर लटपटे यांनी कार्यकर्त्यांना दिशा दिली. अभाविपने कोरोना च्या काळात संपूर्ण राज्यभर सेवा कार्याच्या माध्यमातून सामाजिक भान जपत केलेलं कार्य यावर सुद्धा यावेळी चर्चा करण्यात आली. वर्षभराचे कार्यक्रम योजना वेळापत्रक देखील यावेळी तयार करण्यात आले. ५६ वे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन नंदुरबार येथे होणार आहे याची माहिती देण्यात आली. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ यासाठी जिल्हा स्तरावली संघटनात्मक घोषणा करण्यात आल्या. यावेळी अभाविपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.डॉ.प्रशांत साठे,पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री  देवदत्त जोशी, पश्चिम क्षेत्र सह संघटनमंत्री राय सिंह पूर्णवेळ बैठकीस उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: