मोफत भव्य आरोग्य शिबीर संपन्न

पुणे : लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज, लायन्स क्लब ऑफ पुणे रॉयल, लायन्स क्लब ऑफ पुणे चतुर्शिंगी तसेच समता फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी, मोतीबिंदू लेन्स व मोफत शस्त्रक्रिया बोन्स कॅल्शिअम मशीन द्वारे तपासणी व मोफत औषधे व चष्मे वाटप असे भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरास बिबवेवाडी गावठाण पापळ वस्ती या परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. ३४६ पेक्षा जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी ३८ नागरिकांची नोंद झाली. त्यांना दोन तारखेला शस्त्रक्रियेसाठी एच.व्ही देसाई हॉस्पिटल, मोहम्मद वाडी या ठिकाणी शस्त्रक्रिये साठी घेऊन जाणार आहोत. 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुरेश कोते, चेअरमन महिला गृह उद्योग लिज्जत पापड, माय माऊली केअर सेंटरचे उपाध्यक्ष उद्योगपती विकास मुंदडा, नरेश राठी जीएसटी कॉर्डिनेटर, विभाग अध्यक्षा नीता शहा, नितिन बिबवे अध्यक्ष महाराष्ट्र मराठी पत्रकार संघ, पुणे, विठ्ठलराव वरुडे पाटील अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज, एल सी पी रॉयल सेक्रेटरी मनोहर माकम, एल सी पी पुणे चतुर्शिंगी सदस्य महेश खडके एल सी पी कात्रज चे सेक्रेटरी ला.सतीश कदम, भानुदास पायगुडे, अजय कपिले, प्रतिभा कदम कार्यक्रमाचे आयोजक प्रवीण उत्तमराव शितोळे आणि मित्रपरिवार व सामाजिक क्षेत्रात काम करणारे स्थानिक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: