प्रभाग 28 मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने  पेट्रोल व गॅस दरवाढी विरोधात तीव्र आंदोलन

पुणे:आज प्रभाग क्रमांक 28 मध्ये,महा विकास आघाडीच्या वतीने  पेट्रोल व गॅस दरवाढी विरोधात, गॅस सिलेंडर व दुचाकी वाहनांची अंत्ययात्रा काढून तीव्र आंदोलन करण्यात आले. सत्तेत आल्यापासून भाजप सरकार प्रत्येक वस्तूंचा भाव वाढवत आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच एलपीजी गॅसचे दर तर गगनाला भिडले आहेत. पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे सामान्य माणसाला दुचाकी तसेच इतर वाहने वापरणे मुश्किल झाले आहे  दुचाकी व गॅससिलेंडरची अंत्ययात्रा काढून शोकसभा भरवून मोदी सरकारचा, भाजपा सरकार चा तीव्र शब्दात निषेध नोंदविला.

या आंदोलन ला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर महिला अध्यक्ष मूणाल वाणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, काँग्रेसचे नगरसेवक अभय छाजेड, रमेश बागवे पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष व

प्रभाग क्रमांक 28 मधील काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीचे  सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने आंदोलनास उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: