अ.भा.वि.प. च्यावतीने गोडवाना विद्यापीठाचे मा.परीक्षा नियंत्रक यांना निवेदन

अमरावती :आपण आखिल भारतीय विद्यार्थी परिषद शी सुपरिचित आहातच अभाविप देशातीलच  नव्हे तर जगातील सर्वात मोठी संघटना असुन गेल्या ७२ वर्षापासून शैक्षणीक, सामजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अविरत कार्य करीत आहे
आपल्याला माहीत आहे गेल्या वर्षी पर्यंत महाविद्यालय स्तरावर घेतली जात असलेली MSW प्रवेश परीक्षा या वर्षी पासून विद्यापीठ अंतर्गत घेण्याचे ठरविले व त्यानुसार नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. परंतु अजूनपर्यंत परीक्षा झालेली नाही त्या मुळे परीक्षा कशा पद्धतीनें व केव्हा होणार असे बरेच प्रश्न विद्यार्थ्यांना पडले आहे. त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर करुन लवकरात लवकर प्रवेश पत्र ( holl ticket ) उपलब्ध करून द्यावे.या विद्यार्थ्यांना विद्यापीठ संलग्र महाविद्यालयात प्रवेश देण्यात यावा या मागणीसाठी अ.भा.वि.प. गडचिरोलीच्यावतीने गोडवाना विद्यापीठाचे मा.परीक्षा नियंत्रक यांना 29 ऑटोम्बर 2021  निवेदन देण्यात आले.त्या वेळी गडचिरोली जिल्हा संयोजक अंकुश कुनघाडकर नगरमंत्री जयेश ठाकरे.हिरालाल नुरुती अभाविप चे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: