Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

लखीमपूर येथील घटनेचा निषेधार्थ 27 ऑक्टोबरला पुण्यात जनजागृती यात्रा

पुणे : उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी येथे शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या चार शेतकऱ्यांना आणि एका पत्रकाराला भाजपचे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या गुंडांचा समावेश असलेल्या गाड्यांच्या ताफ्याने चिरडून ठार मारले. 12 पेक्षा अधिक शेतकरी  भर रस्त्यात गाड्याखाली  चिरडले जाऊन गंभीर जबर जखमी झाले. या घटनेच्या निषेधार्थ 27 ऑक्टोबरला पुणे शहरात हमाल भवन मार्केट यार्ड येथे विविध संघटनाकडून  किसान शहीद अस्थी कलशाहित शहीद जनजागृती यात्रा काढण्यात येणार, अशी माहिती जन आंदोलन चे निमंत्रक अजित अभ्यंकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला जन आंदोलनचे अरविंद लका, लताबाई सोनवणे, सुभाष वारे, दत्ता पाखिरे आदी उपस्थित होते.

अजित अभ्यंकर म्हणाले, शहीद जनजागृती यात्रेमध्ये अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, जनआंदोलनाची संघर्ष समिती, कामगार संघटना संयुक्त कृती समिती या संघटना सहभागी होणार आहेत. यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कॉम्रेड अशोक ढवळे, आयटक कामगार संघटनेचे राष्ट्रीय कामगार नेते कॉम्रेड भालचंद्र कांनगो, महाराष्ट्र किसान सभेचे नेते कॉम्रेड नामदेव गावडे, कॉम्रेड अजित नवले, जनआंदोलनांच्या राष्ट्रीय नेत्या मेधा पाटकर, लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे, स्वराज्य इंडियाचे साथी ललित बाबर ,स्वराज्य अभियानाचे नेते मानव कांबळे, शेतकरी संघटनेचे नेते काँग्रेस कॉम्रेड सुभाष सातपुते तसेच राष्ट्रीय पातळीवरचे नेते उपस्थित राहणार आहेत.

लताबाई सोनवणे म्हणाल्या, केंद्र सरकारकडून शेतकरीविरोधी तीन कायदे रद्द व शेतमाल हमीभाव कायदा मंजूर करून घेतल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास प्राप्त करण्यासाठी देशभर अभियान राबविले जात आहे.  पुण्यात होणाऱ्या अभिवादन मेळव्याने महाराष्ट्रात सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातील शेतकरी निसर्गाच्या तडाख्याने हैराण आहे.लालनिशान व पक्षाचे नेते सुभाष कास कुत्ते
यांच्यावर नुकताच घरात घुसून अन्य व्यक्तीकडून भ्याड हल्ला झाला. या हल्लेखोरांना अद्याप अटक झालेली नाही. या हल्ल्याची चौकशी व्हावी अशी आम्ही मागणी करत आहोत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading