Tuesday, July 28, 2026
Latest NewsPUNE

सावित्री फतीमा विचार मंचतर्फे मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त लेखी परीक्षेचे आयोजन

पुणे: साने गुरुजी लिखित ‘इस्लामी संस्कृती’ या मोहम्मद पैगंबर चरित्रावरील पुस्तकाच्या प्रास्ताविकात आदरणीय विनोबा भावे लिहितात हिंदू आणि मुसलमान हजारो वर्षापासून भारतात एकत्र राहत आहेत. तरीही एकमेकांच्या थोर पुरुषा विषयी आणि धर्म ग्रंथाविषयी एकमेकांना फारशी माहिती नसते. तीअसणे जरुरी आहे. या उद्देशाने मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त सावित्री फातिमा विचार मंच पुणे तर्फे साने गुरुजी लिखित ‘इस्लामी संस्कृती’ या पैगंबर चरित्रावर आधारीत लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती सावित्री फातिमा विचार मंच चे समन्वयक अली इनामदार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला डॉक्टर सय्यद रफिक पारनेरकर, गंगाधर बनबरे, विजयकुमार ठुबे उपस्थित होते.

अली इनामदार म्हणाले, संबंधित स्पर्धा तीन गटांमध्ये घेतली जाईल. गट दहावी ते बारावी, गट पदवीधर पदव्युत्तर आणि पीएचडी, गट खुला गट प्रत्येक गटामध्ये अनुक्रमे पहिले बक्षीस 31000 , रुपये, दुसरे 21000 रुपये, तिसरे 11000 रुपये, अशी तीन बक्षिसे दिले जातील. या व्यतिरिक्त प्रत्येक गटात प्रत्येकी 1100 रुपये अशी बक्षिसे उत्तेजनार्थ दिली जातील. स्पर्धेत सहभागी होणार्‍या प्रत्येकाला प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

नाव नोंदणी शुल्क प्रत्येकी शंभर रुपये असेल नाव नोंदणी ऑनलाइन केली जाईल. ही नावनोंदणी 25 ऑक्‍टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत करता येईल. नाव नोंदणी केल्यानंतर प्रत्येकालाच आणि साने गुरुजी लिखित इस्लामी संस्कृती पुस्तक विनामूल्य दिले जाईल.1 1 डिसेंबर 2021 रोजी या पुस्तकावर आधारित 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल. या स्पर्धेत नाव नोंदणी करण्यासाठी http.rzp.io,Cbjxzy.4bwx या लिंकचा वापर करावा, असे आवाहन सावित्री फातिमा मंचच्या वतीने करण्यात येत आहे.

One thought on “सावित्री फतीमा विचार मंचतर्फे मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त लेखी परीक्षेचे आयोजन

  • Manaswita

    the link was not getting opened.

    Reply

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading