अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासाची खुली पाठशाला- सिद्धेश्वर लटपटे
नाशिक : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रत्यक्षन व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण देत असते. हे प्रशिक्षण घेतलेला विद्यार्थी समाजात परिपूर्ण व्यक्ती म्हणून वावरतो. असे प्रशिक्षण देणारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे व्यक्तिमत्व विकासाची खुली पाठशाळा आहे, असे प्रतिपादन अभाविप प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाशिक रोड शहर शाखेच्या “छात्रकुंभ” नावाने छात्र संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी सिद्धेश्वर लटपटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
पुढे ते म्हणाले, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गेल्या दीड वर्षाच्या कोविड काळामध्ये समाजाची मदत करण्याचं काम केले आहे. दीड वर्षापासून महाविद्यालय शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद होते. तसेच गोरगरीब,वाडी वस्तीतील मुल ऑनलाइन शिक्षणापासून वंचित होते. अशावेळी ऑनलाइन शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने “परिषद की पाठशाला’ आयोजित करून महाराष्ट्र प्रांतात विविध ठिकाणी नऊ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना तीन महिने मोफत शिक्षण दिले. समाजामध्ये लसीकरणबाबत प्रंचड अफवा पसरत होत्या.त्यावेळी गांवागांवात जाऊन लसीकरण जनजागृती, थर्मल स्क्रीनिंग अशा विविध उपक्रमांद्वारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता कोविड महामारीत समाजाच्या सेवेसाठी सदैव अविरत कार्यरत होता, असेही ते म्हणाले.
यावेळी प्रदेशमंत्री सिध्देश्वर लटपटे यांच्या हस्ते शहर कार्यकारिणी घोषणा करण्यात आली. नाशिक रोड शहर अध्यक्ष म्हणून प्रा.प्रदीप वाघ तर शहरमंत्री श्रीकांत भोर यांची निवड करण्यात आली. तसेच सहमंत्री म्हणून सानिका शेटे,प्रणिल मोरे,प्राजक्ता सांगळे , कोषप्रमुख पर्णवी साबळे, व्यवस्था प्रमुख प्रसाद जोशी,कार्यालय प्रमुख ओंकार आव्हाड,सोशल मिडिया प्रमुख वैभवी रहाडे,सहप्रमुख शुभम साबळे,विद्यार्थीनी प्रमुख श्रुती देशमुख,सहप्रमुख मेघा राजगुरू, SFD प्रमुख रुषीकेश घाडगे,सहप्रमुख रोहन घाडगे, SFS प्रमुख गणेश सकट,सहप्रमुख मेघा राजगुरू, TSVK प्रमुख पियुष सोमवंशी,सदस्य समृद्धी जोशी, सागर जंजाळे, आदित्य आढाव,अरुण कराड,रुषीकेश कांसाडे यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अदिती डोखे,शुभदा नागरे यांनी केले. आभार ओंकार आव्हाड यांनी केले.
