Tuesday, August 4, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

फक्त जरंडेश्वरच टार्गेट का? याचे ऊत्तर आरोप किरीट सोमय्या यांनी द्यावे – राजू शेट्टी

पुणे: गैरव्यवहार झालेल्या कारखान्यांची यादी मोठी आहे, सगळे चोर आहेत, चोरांना सरकार पाठीशी घालत आहेत.   फक्त जरंडेश्वरच नाही अनेक कारखाने आहेत. सगळे सारखेच आहेत, पण सोयीचे तेवढे काढायचे बाकीच्या झाकायचे असा प्रकार सुरू आहे. आपण सुरूवातीपासूनच या व्यवहारांबाबत ओरडत होतो असे स्पष्ट करून शेट्टी म्हणाले, फक्त जरंडेश्वरच टार्गेट का याचे ऊत्तर आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी द्यावे. असे आव्हान  स्वाभिमानी शैतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिले.

आज साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 
राजू शेट्टी म्हणाले, मी महाविकास आघाडीवर नाराज अन भाजपा सरकार वर खुश अस काही नाही. माझी वाटचाल अशीच असणार,जो आडवा येईल. त्याला तुडवायचं हेच माझे धोरण आहे. राज्य सरकारच्या ताब्यात असलेल्या अनेक कारखान्यांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे.एफआरपी एकरकमीच हवी. डिसेंबरमध्ये ३१००रूपये द्यावे. ऊर्वरित रक्कम जानेवारीत द्यावी. साखरेचे भाव आता केंद्र सरकारने वाढवावेत. किमान ३७ रूपये असा भाव करावा अशी मागणी शेट्टी यांनी केली. राज्य सरकार घोषणा करते तसे वागत नासी. राज्यात ९ लाख उसतोडणी कामगार आहेत. त्यांच्यासाठी जाहीर केलेले गोपीनाथ मंडे ऊसतोडणी कामगार कल्याण महामंडळ यंदा तरी सुरू करावे असे ते म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading