व्हीएबीबी – स्तनांच्या कर्करोगाचे नेमके निदान आणि लहान सोप्या गाठी काढण्यासाठी प्रगत तंत्र

ऑक्टोबर हा स्तनांच्या कर्करोगाबाबतीत जागरूकता पसरवण्याचा महिना साजरा करण्यासाठी, नावाजलेले चिकित्सक डॉ. चैतन्यानंद बी. कॉपीकर, ब्रेस्ट ऑन्को सर्जन, प्रशांति कॅंसर केअर मिशन, पुणे यांनी वेगाने पसरणाऱ्या या रोगाच्या वेळी निदान होण्याच्या महत्त्वावर भर दिले.त्यांनी या सामान्य मिथकावरही प्रहार केले की स्तनांचे कर्करोग केवळ वयस्कर लोकांत होतो. गेल्या दोन दशकांमध्ये ३०-४० या वयोगटातील स्त्रियांना स्तनाच्या कर्करोगाचे निदान होण्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे. हल्लीच्या काळात स्तनाच्या कर्करोगाचे निदान होणाऱ्या ५०% स्त्रिया ५० वर्षांच्या वयाखाली आहेत. स्त्रियांना स्तनांच्या कर्करोगाच्या निदानात खूप लाभकारी असलेल्या व्हॅक्युम असिस्टेड ब्रेस्ट बायोप्सी (व्हीएबीबी)सारख्या प्रगत तंत्रज्ञानांची माहिती असली पाहिजे.

व्हीएबीबीच्या प्रभावितेवर भर देतांना, डॉ. कॉपीकर पुढे म्हणाले, “त्यामुळे लहानात लहान जखमांचे नमुने मिळतात आणि निदान होते; हे नमुने सामान्य शारीरिक चाचणींमध्ये मिळत नसतात. तसेच, व्हीएबीबी स्त्रियांमध्ये सहजगत्या आढळणाऱ्या सोप्या गाठी काढण्यासाठीच्या सर्वांत सुरक्षित पद्धतींपैकी आहे.व्हॅक्युम-असिस्टेड ब्रेस्ट बायोप्सी (व्हीएबीबी)चे प्रमुख फायदे म्हणजे ती वेगवान, कमीत कमी चीर लागणारी, डागांपासून मुक्त आणि एक दिवस निगा लागणारी कार्यपद्धत आहे. ऑक्टोबर स्तंनाच्या कर्करोगाचा जागृती महिना असल्याने, आम्ही स्त्रियांना आपल्या स्तनांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची, वैद्यकीय निदानाच्या गरजेचे संकेत देणाऱ्या लक्षणांवर नजर ठेवण्याची आणि व्हीएबीबीसारखे प्रगत तंत्रज्ञान स्तनांच्या कर्करोगाचे निदान आणि उपचार सहजरित्या करत असल्याने उपचाराला घाबरून न जाण्याची विनंती करत आहोत.”

एकदा स्तनांमध्ये गाठी आढळल्या की स्त्रियांना काळजी वाटायला लागते, भले ते कर्करोगविरहित आणि सोप्या गाठी का असेनात. तरुण स्त्रियांमध्ये(१५-३५ वर्षांचे वयोगट), कर्करोगविरहित गाठी फायब्रोडेनॉमा अधिक सामान्य असतात.*2फायब्रोडेनॉमामुळे २० वर्षांच्या वयाखालील स्त्रियांमध्ये ७५% आणि एकूण स्त्रियांमध्ये स्तन चाचण्या होतात. फायब्रोडेनॉमा कडक, चिकने, रबरासारखे किंवा घट्ट असू शकते आणि एक निश्चित आकारात आढळते. अजून एक खूपच सामान्य परिस्थिती असलेली फायब्रोसिस्टिक ब्रेस्ट डिसीझ स्तनांना गाठीचा किंवा दोरीसारखी घडण प्रदान करते आणि जगभर लाखो स्त्रियांमध्ये तिचे निदान होते.

सामान्यरित्या, या सोप्या गाठी शस्त्रक्रियेद्वारे काढल्या जात, ज्यामुळे खूप वेदना होत आणि डाग राहून जात, किंवा याच्या चिंतेमुळे रुग्ण त्यांच्याबरोबर जगणे पसंत करीत. व्हॅक्युमअसिस्टेड ब्रेस्ट बायोप्सी (व्हीएबीबी)सारखे प्रगत तंत्रज्ञान अशावेळी कामी येते. व्हीएबीबी डाग राहून न देता किंवा स्तनाचे स्वरूप न बिघडता लहानात लहान सोप्या गाठी काढणे शक्य बनवते, जे स्त्रियांसाठी दिलासा देणारे आहे.

डॉ.चैतन्यानंद बी. कॉपीकर पुढे म्हणाले, “स्तन किंवा काखेत कोणतीही गाठ असण्याचे वेळी निदान उपचाराची प्रक्रिया वेळी चालू करण्यात मदत करणारे ठरू शकते. स्तनांचे कर्करोग आजही स्त्रियांच्या मृत्यूंचे प्रधान कारण असले, तरी या रोगाला सामोरे जाण्याच्या अनेक पद्धती आहे, मात्र त्याचे वेळीचे निदान व्हायला हवे. व्हॅक्युम-असिस्टेड ब्रेस्ट बायोप्सी (व्हीएबीबी)सारखे अत्युच्च प्रगत तंत्रज्ञान निश्चित आणि वेळी निदानात रुग्णांना साहाय्य करून परम लाभकारी असे ठरले आहे.

व्हीएबीबीबद्दल

व्हीएबीबी एक अग्रणी ऊतक प्रारूपन तंत्र आहे, ज्याच्याद्वार स्तनांतील अनियमिततांना(सोप्या आणि जड झालेल्या गाठी) सहजगत्या लहान आणि एकच चिराद्वारे हात लावले जाऊ शकते. गाठींना नेमके ओळखण्यासाठी ते मॅमोग्राम, अल्ट्रासाउंड किंवा एमआरआयच्या मदतीने पार पाडले जाते. एकाच सूईने अनेको नमुने संकलित करण्याच्या व्हीएबीबीच्या क्षमतेमुळे ते रुग्णांच्या कार्यपद्धतीच्या वेळा कमी करू शकते आणि कमीत कमी चीर लावणाच्या पद्धतीमुळे रुग्णांना स्तनाच्या चाचणीच्या वेळी होणारे त्रास कमी करू शकते. त्यानंतर हे नमुने तपशीलवार विश्लेषणासाठी आणि गाठ सोपी किंवा जड झालेली आहे, हे ओळखण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवले जातात.

व्हीएबीबीला फायब्रोएडेनॅमा संपूर्णपणे काढण्यासाठी एफडीए(अमेरिका) आणि नाइस(यूके) यांनी मान्यता दिली आहे.विदेशात हे प्रगत तंत्रज्ञान व्यापकपणे वापरले जाते आणि आता भारतातही उपलब्ध असून स्त्रियांना आपल्या आरोग्याचे नियंत्रण मिळवून स्तनांच्या कर्करोगावर मात करण्यास मदत करत आहे.व्हॅक्युम-असिस्टेड ब्रेस्ट बायोप्सी तंत्रज्ञान अशा लहान स्तनांच्या गाठींना लक्ष करण्याची कार्यक्षमता, अचूकता आणि सहजता वाढवते आणि म्हणून सोनेरी मानक म्हणून जगभर वापरले जात आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: