ब्रिटीश काउंसिल आणि महाराष्ट्र सरकारच्या १० वर्षांच्या भागीदारीतून विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार शिक्षण

पुणे  : शैक्षणिक संधी आणि सांस्कृतिक संबंधांसाठीच्या युनायटेड किंग्डमच्या ब्रिटीश काउंसिल ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेने महाराष्ट्र सरकारसोबत सफल शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी केलेल्या भागीदारीला आज १० वर्षे पूर्ण झाली. ह्या अवधीमध्ये (२०१२-२०२१) ह्या कार्यक्रमांद्वारे सफल प्रकारे सुमारे २,००० मास्टर ट्रेनर्स आणि १४६,००० शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले व त्याचा लाभ राज्यातील सरकारी शाळांमधील ४ .३८ लाख विद्यार्थ्यांना झाला.

आज मुंबई येथे महाराष्ट्र सरकारच्या माननीया शालेय शिक्षण मंत्री सौ. वर्षा गायकवाड आणि ब्रिटीश काउंसिलचे पश्चिम भारत संचालक डॉ. योवन इलिक ह्यांच्या उपस्थित ह्या कार्यक्रमावरील एका स्वतंत्र मूल्यमापन अहवालाचे सादरीकरण करण्यात आले. ह्या कार्यक्रमामध्ये ह्या उपक्रमांच्या सफलतेमध्ये योगदान देणा-या टाटा ट्रस्टसह भागीदार व मुख्य भागधारकांच्या सहभागाची दखल घेतली गेली. त्यामध्ये सरकारी अधिकारी, शिक्षक, प्रशिक्षक, इंग्रज विषय सहाय्यक राज्य शैक्षणिक संसाधन व्यक्ती आणि शिक्षक कृती गट समन्वयक ह्यांचेही योगदान चर्चले गेले.

२०१२ -२१ ह्या काळात महाराष्ट्र सरकारने चार जिल्हा स्तरीय प्रकल्पांची सुरुवात केली होती व त्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्यातील सेवेमधील सरकारी प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या इंग्रजी प्रभूत्वामध्ये सुधारणा करणे हे होते. इंग्रजी भाषा प्रशिक्षण व अध्यापनशास्त्राच्या आपल्या व्यापक अनुभवाच्या आधारे ब्रिटीश काउंसिलने ह्या चार प्रकल्पांचे वैशिष्ट्यपूर्ण आरेखन केले व ते राबवले. ह्या १०- वर्षांच्या कार्यक्रमाने ‘प्रशिक्षण एक कार्यक्रम’ नाही तर ‘प्रशिक्षण एक प्रक्रिया’ अशी मानसिकता बदलण्यामध्ये लक्षणीय यश मिळवले व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासावर केंद्रीत स्पष्ट असा मानसिक बदल घडवून आणण्यासाठी मदत केली.

तिस-या पक्षाच्या मूल्यमापनामध्ये राज्याच्या गरजा अणि उद्दिष्टांच्या संदर्भात मह्त्त्व व उपयोग, त्याची परिणामकारकता, उपयोगिता, परिणाम आणि संभाव्य शाश्वतता ह्या अनुषंगाने शिक्षक शिक्षणामध्ये झालेल्या रुपांतरणातील ब्रिटीश काउंसिलच्या योगदानाचा त्यामध्ये सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.यात प्रामुख्याने राज्यातील भविष्यातील शिक्षक शिक्षण कार्यक्रमासाठी पुराव्यावर आधारित शिफारसी व भाकितेही करण्यात आली आहेत व त्यामध्ये जेंडरशी संबंधित घटक आणि तंत्रज्ञानाच्या वाढलेल्या अंगीकारासाठीच्या संधी अशा बाबींचा समावेश आहे.

महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण मंत्री सौ. वर्षा गायकवाड म्हणाल्या की आमच्या राज्यातील सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या लक्षावधी विद्यार्थ्यांच्या अध्ययन दर्जामध्ये व शिक्षणाच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी आमचे राज्य सरकार कटिबद्ध आहे व ह्या उद्देशाच्या दिशेने ब्रिटीश काउंसिलने सादर केलेल्या परिणाम अहवालाला बघताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे. तेजस, प्राथमिक शाळांसाठी इंग्रजी भाषा उपक्रम ,माध्यमिक शाळांसाठी इंग्रजी भाषा उपक्रम आणि इंग्लिश फॉर ऑल मुंबई अशा त्यांच्या कार्यक्रमांमुळे शिक्षकांच्या योग्यतेमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे व त्यामुळे दर वर्षी आपल्या विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तेचे शिक्षण मिळाले आहे.

ब्रिटीश काउंसिलचे पश्चिम भारताचे संचालक डॉ. योवन इलिक म्हणाले की राज्यातील सरकारी शाळांमधील इंग्रजी प्रभूत्वाच्या स्तरामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि राज्य सरकारच्या ज्ञान संबंधित उद्दिष्टांना सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा दीर्घकालीन भागीदार असल्याचा आम्हाला आनंद आहे. आमच्या विविध प्रकल्पांद्वारे शालेय शिक्षण प्रणालीला सहाय्य करण्यासाठी व शाश्वत सकारात्मक परिणाम प्राप्त करण्यासाठी सज्ज होण्यासाठी दीर्घ- कालीन सुधारणा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिक्षकांच्या शाश्वत विकासाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराच्या सातत्याने स्पर्धात्मक होणा-या जगतामध्ये सफल होण्यासाठी ह्या प्रणालीद्वारे मदत दिली जात आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: