Wednesday, July 29, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

Pune Accident: नवले पूल जवळ पुन्हा अपघात, टँकरने 15 वाहनांना उडवले, ३ जण ठार

पुणे : नवले पूल जवळ आज पुन्हा भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून, या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. थिनर घेऊन जाणाऱ्या टँकरने समोरील 15 ते 16 वाहनांना उडवत फरफटत नेले असून, घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेंगलोरकडून पुण्याकडे येत असलेल्या थिनर घेऊन जाणाऱ्या टँकरचे या उतारावर आल्यानंतर नियंत्रण सुटले आणि त्याने समोरील वाहनांना उडविण्यास सुरुवात केली. टँकरने जवळपास 15 ते 16 वाहनांना उडवले. तर काही वाहनांना फरफटत नेले. या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर 12 ते 13 लोक जखमी झाले आहेत.

घटनास्थळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. पोलीस, अग्निशमन दल येथे दाखल झाले आहे. त्यानी वाहने दोन्ही बाजूने बंद केली आहेत. थिनरचा टँकर असल्याने जमावाला बाजूला करण्यात आले आहे. तर अग्निशमन दलाच्या जवान मदत करून वाहने बाजूला करत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading