सणासुदीच्या काळात स्वस्त धान्य दुकानात नागरिकांना मिळणाऱ्या अन्न-धान्याची चौकशी करा… – संभाजी ब्रिगेड
पुणे : दिवाळी काही दिवसावर आलेली असताना सुद्धा सणासुदीच्या काळात पुणे शहरात निकृष्ट दर्जाचा तांदूळ आणि गहू वितरीत केला जात आहे बऱ्याच शहरातील रेशन दुकानात अन्न धान्याचा काळाबाजार सुरू आहे, तो त्वरित थांबला पाहिजे. कुठेही निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप करू नये. दिवाळी सणासाठी प्रति मानसी 5 किलो वाढीव धान्य उपलब्ध करून द्यावे. म्हणजेच साखर, तेल, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, तूरडाळ, मूगडाळ, मिळावे ही प्रमुख मागणी आहे. म्हणून पुणे शहरात निकृष्ट दर्जाच्या तांदूळ आणि गहू पुरवठ्याबाबत… स्वस्त धान्य वितरण विभागास संभाजी ब्रिगेड पुणे शहराध्यक्ष अविनाश मोहिते यांनी इशारा दिला आहे.
आपण गोर गरिब, कष्टकरी, वंचितांना, स्वस्त धान्य लाभार्थ्यांना, केसरी कार्ड धारकांना, योजनांपासून बाजूला ठेवू नये. भारताच्या प्रत्येक नागरिकाला कायद्याने (संविधानाने) एक प्रकारचा हा अधिकारच दिलेला आहे. कोणीही उपाशी पोटी राहू नये. हा भारत सरकारचा नियम आहे. जो शिधापत्रिकेचा लाभार्थी आहे त्याच्यापर्यंत अन्नधान्याची सुविधा पोहोचली पाहिजे अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे.
पुणे शहरातील झोपडपट्टीतील, रहिवाशांनी संभाजी ब्रिगेड’कडे मोठ्या प्रमाणात तक्रारी केलेले आहेत. त्यांच्या प्रभागातील अन्नधान्य सुविधा केंद्रे चालविणारे दुकानदार लोकांशी अरेरावीची भाषा करतात. त्यांना निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप करतात. जे अन्न खाण्याच्या लायकीचे सुद्धा नसते प्राणी सुद्धा या धान्याला तोंड लावत नाहीत. असे अन्न गरिबांच्या माथी मारले जाते. दुकानदार सतत मनमानी कारभार करतात.अन्नधान्याचा काळाबाजार करतात अशी लोकांची तक्रार आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत प्रति लाभार्थी प्रतिमहिना पाच किलो धान्याची योजना असून सुद्धा त्याचा लाभ मात्र बहुतांश लोकांना मिळत नाही. लोकांच्या भावना तीव्र असल्या कारणाने होणाऱ्या नुकसानीस व त्रासास अन्नधान्य वितरण विभाग जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. असा इशारा संभाजी ब्रिगेडचे महानगराध्यक्ष अविनाश मोहिते यांनी दिलेला आहे.
अन्नधान्य वितरण… उपजिल्हाधिकारी सचिन ढोले व अन्नधान्य आस्थापना विभाग पुणे शहराचे तहसिलदार हाणमंत कोळेकर यांनी स्वीकारले निवेदन. यावेळी संभाजी ब्रिगेड’चे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, महानगराध्यक्ष अविनाश मोहिते, अॕड. विकास शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष महादेव मातेरे, खडकवासला विधानसभा अध्यक्ष स्वप्निल रायकर आदी उपस्थित होते.
