तळजाई बचावासाठी शिवसेनेचे तळजाई मातेला साकडे..

पुणे : दग्रस्त तळजाई वसुंधरा जैवविविधता प्रकल्पाला विरोध करण्यासाठी पुणे शहर शिवसेना मैदानात उतरली आहे. पुणे शहर शिवसेनेच्या वतीने या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी तळजाई देवीची महाआरती करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुखनगरसेवक आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. फूड मॉलजॉगिंग ट्रॅकसोलर पार्किंगतसेच बांबू उद्यानकृत्रिम नक्षत्र उद्यानसाठी १२० कोटी रुपये खर्च करुन सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी येथील अस्तित्वात असलेली नैसर्गिक जैवविविधता नष्ट करण्याचा डाव महापालिका प्रशासनाने घातला आहे. याला विरोध करत शिवसेना रस्त्यावर उतरली आहे.

संजय मोरे म्हणाले कीतळजाई टेकडीवर जैवविविधता वसुंधरा प्रकल्प या गोंडस नावाखाली मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येणार असून येथील झाडे तोडण्यात येणार आहेत. शिवसेनेचे पर्यावरणमंत्री असल्यामुळे त्यांची देखील भूमिका पर्यावरण संवर्धानाचीच आहे. पाचगाव पर्वतीतळजाई येथे कोणत्याही प्रकारचे कॉंक्रिटीकरण खपवून घेतले जाणार नाही. ज्या उद्देशासाठी येथील भूसंपादन झाले तोच उद्देश सफल व्हावा अशी आमची मागणी आहे. आमचा विरोध विकासाला नसूनविकासाच्या नावावर नैसर्गिक जैवविविधता नष्ट करण्याला आहे. सकाळी व संध्याकाळी येथे चालायलाव्यायाम करण्यासाठी व मोकळ्या हवेत फिरायला येणाऱ्या हजारो नागरिकांना शंभर टक्के ऑक्सिजन मिळत आहे. त्यावर घाला घालण्याचे काम होणार आहे याला शिवसेनेचा विरोध आहे.

गजानन थरकुडे म्हणाले कीटेकड्या वाचविण्याचे काम शिवसेना पुर्वीपासून करत आली आहे. तळजाई टेकडीवरच्या सिमेंट कॉंक्रीटीकरणाला आमचा विरोध आहेत्यासाठी शिवसेना कोणाच्याही विरोधात जायला तयार आहे. येथील झाडांमुळेच पुणेकरांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळत आहेतीच झाडे तोडण्याला आम्ही विरोध करत आहोत. पर्यावरण मंत्री या विषयावर गांभिर्याने विचार करतीलशिवसेना पुणेकरांच्या पाठीशी ठामपणे उभी असणार आहे.

यावेळी शहरप्रमुख संजय मोरेगजाननभाऊ थरकुडेनगरसेवक बाळासाहेब ओसवालनगरसेविका संगीता ठोसरअनंत घरतकिशोर रजपूतआनंद गोयलसंतोष गोपाळअर्जुन जान गवळीकिशोर रजपूतसुरज लोखंडेयुवराज पारीखमकरंद पेठकर, आजी-माजी पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: