यंदाच्या महापौर चषक स्पधेला महापालिकेच्या वित्तीय समितीचा ‘रेड सिग्नल’

पुणे: महापौर चषक स्पर्धा घेण्याची मान्यता देण्यास महापालिकेच्या वित्तीय समितीने नकार दिला आहे. त्यामुळे गतवर्षी रद्द झालेली महापौर चषक स्पर्धेवर यंदाही अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.

शहरातील नवीन खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना व्यासपीठ मिळवरून देण्यासाठी महापालिकेतर्फे दरवर्षी महापौर चषक स्पर्धेचे आयोजन केले जाते. ही स्पर्धा दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात घेतली जाते. या स्पर्धांमध्ये अधिकाधिक खेळाडूंनी सहभागी व्हावे, यासाठी महापालिकेकडून खेळाडूंना सुविधाही दिल्या जातात. त्यासाठी 7 ते 8 कोटी खर्च केले जातात. यामध्ये सुमारे 18 ते 20 स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेंतर्गत होणार्‍या विविध स्पर्धा आपल्या प्रभागात आयोजित करण्यासाठी नगरसेवकांमध्ये मोठ्या प्राणात स्पर्धा लागते. या स्पर्धा खुल्या गटासोबतच शालेय स्थरावरही आयोजित केल्या जातात.

मात्र गतवर्षी कोरोना संकटामुळे महापौर चषक स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने घालण्यात आलेले निर्बंध टप्प्या टप्प्याने कमी केले जात आहेत. प्रशासनाने शाळा, महाविद्यालये, मैदाने, जलतरण तलाव, खुली केल्याने मागील वर्षी रद्द झालेली महापौर चषक स्पर्धा यंदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. या संदर्भात प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू होत्या. त्याचाच एक भाग म्हणून स्पर्धेच्या खर्चाला मान्यता देण्याबाबत वित्तीय समितीकडे विचारणा करण्यात आली होती. मात्र गुरूवारी झालेल्या वित्तीय समितीच्या बैठकीत आर्थिक संकटाचे कारण देत समितीने स्पर्धा घेण्यास व त्यासाठीच्या खर्चास मान्यता देण्यास नकार दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: