Wednesday, July 29, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोण असणार यापेक्षा महिलांना न्याय मिळणं जास्त महत्वाच – चित्रा वाघ 

मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्त होणार हे मला माहिती नाही, त्या पदावर कोण येतंय हेही महत्त्वाच नाही. तर महिलांना न्याय मिळणं महत्त्वाचं आहे असं मत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केले. तसेच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना आपण ‘शूर्पणखा’ म्हटले नाही, असे चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यात चांगलच रामायण सुरू आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच नाव चर्चेत आल्यावर चित्रा वाघ यांनी एक ट्विट केले. अन्  त्यामध्ये चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांना आपण ‘शूर्पणखा’ म्हटले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. यावर आज पत्रकार परिषद गहेवून चित्रा वाघ यांनी स्पष्टीकरण दिले.

चित्रा वाघ म्हणाल्या की, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अद्याप कोणाच्याही नावाची घोषणा झाली नाही. मी फक्त एवढंच म्हटलं त्या पदावर जे कोणी बसेल त्यांनी शूर्पणखाच्या भूमिकेत जाऊ नये. कोणीही तिथे बसेल त्यांनी रावणाला साथ देऊ नये. आता माध्यमांनी याचा चुकीचा अर्थ घेत ते रुपाली चाकणकरांना उद्देशून असल्याच्या बातम्या चालवल्या. पण मी कोणाचंही नाव घेतलेल नाही.

राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या की, कामावर टिप्पणी करा, वैयक्तिक आयुष्यावर टिप्पणी केल्यास खपवून घेतली जाणार नाही. विद्या चव्हाण यांनी पुरावे दिल्यास आपण राजीनामा देऊ असंही त्या म्हणाल्या. नवरात्र सुरु आहे पण मात्र सरकार महिलांच्या सुरक्षा साठी काही करत नाही असंही त्या म्हणाल्या.

चित्रा वाघ यांनी नेमकं काय ट्विट केलं ? 

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच नाव काल पासून प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत आहे. यावरून चित्रा वाघ यांनी ”राज्य महिला आयोगासाठी अध्यक्ष लवकर नेमावा, पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका”, अशा प्रकारचे ट्वीट केले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading