रोपोसो तर्फे लाइव्ह एंटरटेनमेंट कॉमर्स लाँच

पुणे : मोबाइल आणि ऑनलाइन कॉमर्स क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने रोपोसोने आज भारतातील पहिले डिजिटल ‘क्रिएटर्सच्या नेतृत्वाखाली चालणारे लाइव्ह एंटरटेनमेंट कॉमर्स’ लाँच करत असल्याची घोषणा केली आहे. रोपोसोच्या या नव्या सेवेमुळे ग्राहकांना उच्च दर्जाची उत्पादने, आपल्या लाडक्या क्रिएटर्सबरोबर तत्काळ खरेदी करता येणार असून ‘व्हर्च्युअल मॉल’ वातावरणातील मनोरंजक, आधुनिक पॉप-संस्कृतीमध्ये भाग घेता येईल. यातून रोपोसोला भारतीयांची खरेदी करण्याची पद्धत आमूलाग्र बदलण्याची क्षमता मिळेल तसेच देशातील क्रिएटर अर्थव्यवस्थेला विविध औद्योगिक संधींच्या मदतीने हजारो क्रिएटर्सना व्यापक प्रमाणात सक्षम करता येईल.

रोपोसो प्लॅटफॉर्मवरील खरेदीदारांना क्रिएटर्सनी शिफारस केलेली उत्पादने मनोरंजक, आकर्षक व गुंतवून ठेवणाऱ्या लाइव्ह स्ट्रीमसह शोधता येतील, क्रिएटर्सच्या नेतृत्वाखाली शेकडो पॉप स्टोअर्सना भेट देता येईल आणि आपल्या लाडक्या स्टार्सना जवळून जाणून घेता येईल. फॅशन आणि सौंदर्य, आरोग्य आणि फिटनेस, इलेक्ट्रॉनिक्स, घर सजावट, जीवनशैली या व अशा क्षेत्रात त्यांना खरेदीसाठी भरपूर वाव मिळणार असून त्याचबरोबर जेन झेडच्या आवडत्या क्रिएटर्सच्या लाइव्ह कार्यक्रमांना हजेरी लावता येणार आहे. युजर्स, क्रिएटर्स आणि एंटरटेनर्सना प्रत्यक्ष जगासारखा अनुभव देण्यासाठी रोपोसो आपल्या लाइव्ह स्ट्रीममध्ये स्क्रीनच्या दोन्ही बाजूला संवाद साधण्यासाठी वेगवेगळ्या सुविधांचा समावेश करणार आहे.

रोपोसोतर्फे आपल्या क्रिएटर्ससाठी प्लॅटफॉर्मवर कमाईचे भरपूर पर्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. लाइव्ह अनुभव तयार करण्याबरोबरच क्रिएटर्स रोपोसोवर आपले मल्टी- ब्रँड पॉप स्टोअरही चालवतील, ज्यामुळे त्यांना दमदार व्यवसाय करण्याचा मार्ग खुला होईल तसेच व्यापक पातळीवर आपली वैशिष्ट्यपूर्ण ओळख तयार करता येईल. ग्लान्स लॉक स्क्रीनवरही लाइव्ह जाण्याची संधी असल्यामुळे क्रिएटर्सना ग्लान्सच्या भारतातील १५० दशलक्षांहून अधिक मोठा ग्राहकवर्ग खुला होईल. भविष्यातही क्रिएटर्सना पेड मास्टरक्लास तसेच तिकिट असलेले लाइव्ह शोज उदा. संगीतरजनी, स्टँड अप कॉमेडी, टॉक शोज, फॅशन शोज आयोजित करून आपल्या कौशल्याच्या मदतीने कमाई करता येईल.

इनमोबी समूहाचे सह- संस्थापक आणि ग्लान्सचे अध्यक्ष व सीओओ पियुष शहा म्हणाले की क्रिएटर्सच्या नेतृत्वाखाली लाइव्ह खरेदी करण्यासाठी भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म उभारून येत्या काही तिमाहींमध्ये तो आग्नेय आशिया व अमेरिकेत नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. ऑफलाइन खरेदीप्रमाणे ऑनलाइन खरेदी करताना समग्र अनुभव घेण्याला जगभरातून मागणी वाढत आहे. 

 

Leave a Reply

%d bloggers like this: