ओबीसी ला सरकार न्याय देत नसेल तर आम्ही आंदोलन करणार-मंगेश ससाणे

पुणे:ओबीसी समाजातील अनेक प्रश्न प्रलंबित असून यामध्ये 72 वसतिगृह ही फक्त कागदी घोषणा झाली ओबीसी विद्यार्थी शिष्यवृत्ती ,महाज्योती योजना संदर्भात महा घोटाळा आशा अनेक प्रश्न ओबीसी समस्या असून देखील सरकार यावर न्याय देत नसेल तर आम्ही आंदोलन करणार आहोत. अशी  माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत ओबीसी चे समन्वयक मंगेश ससाने यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला मंगेश ससाणे, मृणाल ढोले, नितीन बोराटे ,कमलाकर दरोडे, नंदकुमार गोसावी, सुरेश गायकवाड, योगेश पिंगळे ,विजय बोडेकर, धनराज झुरंगे,बंडू कचरे, अक्षय कोठावळे उपस्थित होते
मंगेश ससाने म्हणाले ,ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी सर्व बाजूनी प्रयत्न चालू असताना त्यात यश मिळविण्यासाठी कायदेशीर लढाई देखील चालू आहे
ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी अनेक त्रुटी असून एमपेरिकल डाटा जमा करण्याचे कामकाज ठप्प आहे कर्मचारी वर्ग देण्यात आलेला नाही ओबीसीचा इमपीरियाल डाटा गोळा करण्याचे आदेश असूनही कामच सुरू झालं नाही आशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका निवडणुका देखील घोषित झाल्या आहेत तरी देखील सरकार याबाबतीत निष्काळजीपणा करीत आहे .असे मंगेश ससाने म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: