छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यावर चढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजु नवघरे यांचा जाहीर निषेध -चंद्रशेखर घाडगे

पुणे:छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी सर्वोच्च आहेत, त्यांची झालेली विटंबना संभाजी ब्रिगेड कधीच सहन करणार नाही वसमत चे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार राजु नवघरे यांनी त्वरित माफी मागावी अन्यथा पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालया समोर आंदोलन करून ह्या राजु नवघरे नावाच्या शिवद्रोही आमदाराचा पुतळा जाळला जाईल.असा इशारा संभाजी ब्रिगेड चे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी दिला आहे.

वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा अनवरणा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे वसमत चे आमदार हे चक्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यावर चढले आणि शिवरायांना हार घालण्याचा प्रयत्न केला, ह्या आमदाराच्या पायाचे निरीक्षण करा याचे पाय महाराजांच्या पोटाला स्पर्श करीत आहेत, हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान आहे, याची आमदाराला लाज कशी वाटत नाही, राष्ट्रवादीचे आमदार राजु नवघरे आणि शिवसेनेचे माजी आमदार यांच्या आधी हार घालण्याच्या चढवढीत राजु नवघरे हे चक्क शिवरायांच्या घोड्यावरच चढले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना हार घालण्याचा प्रयत्न केला,

छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी सर्वोच्च आहेत, त्यांची झालेली विटंबना संभाजी ब्रिगेड कधीच सहन करणार नाही आमदार राजु नवघरे यांनी त्वरित महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालया समोर आंदोलन करून ह्या राजु नवघरे नावाच्या शिवद्रोही आमदाराचा पुतळा जाळला जाईल, असे संभाजी ब्रिगेड चे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी सांगितले.छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कोणीही मोठा नाही, लोकांनी असल्या नालायक लोकप्रतिनिधीला निवडून दिल आहे त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांना हार कसा घालावा हे सुद्धा माहीत नाही,
राजु नवघरे माफी मागा अन्यथा परिणामांना सामोरे जा.असा इशारा संभाजी ब्रिगेड चे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी दिला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: