Wednesday, July 29, 2026
Latest NewsPUNE

नागरिकांना हक्क मिळवून देण्याचे काम शहर कॉंग्रेस करेल – शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम


पिंपरी : समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत कॉंग्रेसची विचारधारा पोहचविण्याचे काम पक्ष श्रेष्टींनी माझ्यावर दिले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपाने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. ज्या प्रमाणात महापालिका कर आकारते त्या प्रमाणात आरोग्य, पाणी, रस्ते याच्या सुविधा मिळत नाहीत. या भ्रष्ट कारभारावर आवाज उठवण्याचे आणि सामान्य नागरिकांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचे काम यापुढे शहर कॉंग्रेस करेल असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.


पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी चिंचवड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, राष्ट्रीय सेवा दलाचे सचिव संग्राम तावडे, महिला कॉंग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, माजी महापौर कविचंद भाट, ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे, युवक शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे,  राजेंद्रसिंह वालिया, उमेश खंदारे, डॉ. वसिम इनामदार,  मनोज कांबळे, विरेंद्र गायकवाड,  सुंदर कांबळे, माजी नगरसेवक सद्‌गुरु कदम, विश्वास गजरमल,  शाम अगरवाल, विजय ओव्हाळ, इस्माईल संगम, शहर सरचिटणीस सज्जी वर्की, इंटकचे शहराध्यक्ष एम. तिरुमल, निखिल भोईर, पिंपरी युवक कॉंग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, लक्ष्मण रुपनर, सौरभ शिंदे, सुनिल राऊत, वकिल प्रसाद गुप्ता, शोभाताई पगारे, देवानंद गुप्ता, शाकीब खान, जितेंद्र छाबडा, हरिनारायण, रोहित भाट, रविंद्र नांगरे आदी उपस्थित होते.

अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपा दिवसाढवळ्या करदात्या नागरिकांच्या पैशाची लूट करीत आहे. अनागोंदी कारभार करुन काही नेते सिंडीकेट चालवितात. त्यांना एक्सपोज करण्याचे काम पुढील काळात  डॉ.  कदम यांच्या माध्यमातून केले जाईल. 


डॉ. कैलास कदम म्हणाले की, कॉंग्रेस पक्ष श्रेष्ठींनी माझ्यावर सोपावलेली ही जबाबदारी यशस्विरित्या पार पाडेल. पिंपरी चिंचवड कामगार नगरीचा नावलौकिक वाढविण्यामध्ये येथील स्थानिक शेतकरी भूमिपुत्रांचे खूप मोठे योगदान आहे. तसेच कामगारांच्या श्रमामुळे या शहराला आता आंतरराष्ट्रीय पातळीवर एक स्वतंत्र उद्योग नगरी, आय. टी. हब, क्रीडानगरी म्हणून ओळख निर्माण झाली आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading