Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

गायकवाड पिता-पुत्राची येरवडा कारागृहात रवानगी

दीपक गवारे, सोनाली गवारे व अंकुश राजुदादा यांना 5 दिवसांची पोलिस कोठडी..

पुणे : खुनाचा प्रयत्न, खंडणी, अवैध सावकारी आणि बळजबरीने जमिनी हडप केलेले डबल मोक्क्यातील आरोपी नानासाहेब गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. त्याचबरोबर नंदा गायकवाड आणि दीपा पवार यांची देखील येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तर इतर आरोपी दीपक गवारे, सोनाली गवारे व अंकुश राजूदादा यांना मोक्का न्यायाधीय(मे. शिरसिकर साहेब) यांचे न्यायालयाने या तिघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी तसेच मुळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. हृषिकेश धुमाळ यांनी काम पाहिले.

डबल मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या गायकवाड आणि त्याचे साथीदारांवर कारवाई करण्यात आली. मात्र अद्याप रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन वाळके आणि संदीप वाळके हे दोघे फरार आहेत. सदर गुन्ह्यात देखील दोघांचा मुख्य सहभाग होता. त्यांच्यावर सांगवी आणि चतुश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. वाळके बंधूंनी औंध-बाणेर रोड येथे लोकांच्या जागेवर अवैध्यरित्या बळजबरीने ताबा मारुन त्यावर ‘तात्याचा ढाबा’ नावाचे हॉटेल सुरु केलेले आहे, ते अल्पावधीतच प्रसिध्द झाले. गुन्ह्यातील मुख्य आरोपी नानासाहेब गायकवाड पित्रापुत्राला पुणे पोलीसांनी कर्नाटकमधील उडपी येथून अटक केली होती.

मुख्य आरोपी नानासाहेब शंकरराव गायकवाड ऊर्फ भाऊ सह त्याच्या साथीदारांविरोधात मागील काही वर्षाच्या कालावधीमध्ये खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी व जबर दुखापतीसाठी पळवुन नेणे, दुखापत करणे, बेकादेशीर जमाव जमविणे, कट रचून बनावटीकरण करून फसवणूक करणे, डांबून ठेवणे, जिवे मारण्याची धमकी देणे, घातक अग्नीशस्त्र बाळगणे, अवैधरीत्या पठाणीपद्धतीने सावकारी करणे वगैरे गंभीर स्वरुपाचे गुन्हे पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रांमध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत.

गायकवाड याच्यावर डबल मोकाची कारवाई झाल्यानंतर पोलीसांच्या आत्तापर्यंतच्या तपासामध्ये गायकवाडच्या केवळ दोन लॉकरमधील कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त झाला असून असे अनेक लॉकर पोलीसांच्या रडारवर आहेत. त्यातील एका लॉकरमध्ये एक कोटी वीस लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या विटा, हि-यांचे दागिने, तर दुस-या लॉकरमध्ये पन्नास लाख रुपये रोख स्वरुपात पोलीसांनी जप्त केले आहेत. यामध्ये फिर्यादी काटे यांच्याकडून बळजबरीने लिहून घेतलेली मूळ कागदपत्रे देखील सापडली आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading