fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRA

आरक्षण, शेतकरी प्रश्नांवर महाजन यांची महाविकास आघाडी सरकारवर टीका

नाशिकः आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेते गिरीश महाजन यांनी राज्य सरकावर टीका केली. ते म्हणाले, राज्य सरकारने ओबीसी समाजावर खूप मोठा अन्याय केला आहे. तांत्रिक बाबी पूर्ण केल्या नाहीत. त्याचा फटका या समाजाला बसला. सरकार तुमचे असताना ही वेळ का. अर्ध्या मंत्रिमंडळाला वाटते मराठाला नको आणि अर्ध्या मंत्रिमंडळाला वाटते ओबीसीला नको. तसेच  शेतकरी प्रश्नांवरूनही त्यांनी सरकारवर टीका केली. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे. अजून सरकारने कोणालाच मदत केली नाही. त्यामुळे शेतकरी संपुष्टात येत असल्याचे महाजन म्हणाले.

शरद पवार उत्तर प्रदेशच्या घटनेबद्दल बोलले आणि धाडी सुरू झाल्या, असे काहीही नाही. ते स्वतः म्हणाले आहेत की, पाहुणे जाऊ द्या म्हणून. त्यामुळे अजित पवारांच्या धाडीसंदर्भात जे काही असेल, ते समोर येईलच. ड्रग्सच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसने एवढा पुढाकार घेतला आहे. आजची तरुण पिढी जागृत होत आहे. त्यातही राजकारण आणणे चुकीचे आहे. शेतकरी किंवा इतर कुठलाही मुद्दा असो त्यात राजकारण आणायचे हे या सरकारने ठरवलेले दिसते, असा आरोपही त्यांनी केला.

गिरीश महाजन म्हणाले, खडसे यांच्या पाठीशी कधीच बहुमत नव्हते. पूर्वीपासून ते काठावर निवडून येत होते. कोणाला दोष देऊन उपयोग नाही. कधी म्हणता फडणवीसांमुळे पडलो, कधी म्हणता माझ्यामुळे. दोन वर्षानंतर त्यांना कळलं मी त्यांना पाडले म्हणून, असा चिमटाही त्यांनी काढला. राज्यातील अनेक सहकारी बँका डबघाईला आल्या आहेत. जळगाव जिल्हा बँकेत शेतकऱ्यांसाठी आम्ही एकत्र आलो. ही निवडणूक बिनविरोध करू, असेही ते म्हणाले. तसेच जळगावमध्ये अनेक नगरसेवक पुन्हा परत यायचं म्हणत आहेत. १७ ते १८ जण संपर्कात आहेत असा दावाही त्यांनी केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading