fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

रमाई रत्न पुरस्कार लता राजगुरू यांना प्रदान

पुणेः- राजगुरु कुटुंबियावर बाबासाहेब आंबेडकर संस्कार आहेत आणि कृतिशीलता महात्मा गांधीची आहे.बाबासाहेब आणि गांधी या दोघांमध्ये काही तात्विक मतभेत होते पंरतू बाबासाहेबांनी काँग्रेसचे निमंत्रण स्वीकारले आणि राज्यघटना निर्माण केली. काॅग्रेसचे आमंत्रण स्विकारुन बिगर काॅंग्रेसी आंबेडकर काँग्रेसच्या पहिल्या मंत्रिमंडळात रुजू झाले आहेत, ही जी राष्ट्रभक्तीची संकल्पना आहे त्या संकल्पनेच्या दोन महापुरुषांचा वारसा लता राजगुरु यांना लाभेलेला आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक तर्फे देण्यात येणा-या रमाई रत्न पुरस्काराने
पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका लताताई दयाराम राजगुरु यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते गाैरविण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

रमाई महोत्सवाचे अध्यक्ष प्रमोद आडकर आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आयच्या प्रवक्तत्या उत्कर्षा रुखवते यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती. यावेळी कुणाल दयाराम राजगुरु आणि प्रेरणा विठ्ठल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

सबनीस म्हणाले, ज्या घरात थाटस आॅफ पाकिस्तान हे पुस्तक बाबासाहेबांनी लिहिले, सुमारे 21 दिवस बाबासाहेबांनी राजगुरु यांच्या घरी मुक्काम केला. हा समृद्ध वारसा गांधीच्या महात्मा पणाला जोडून या देशाच्या एकात्मतेचा आणि सार्वभाैमत्वाचा प्रश्न सोडतांना वर्तमान महाराष्ट्र आणि वर्तमान भारत ताडीवाला रोड येथील विकसीत करण्याचा निर्धार प्रत्यक्ष कृतीशिलतेच्या अनेक प्रयोगातून लताताई यांनी अमंलात आणला आहे.

यावेळी रमाई महोत्सवाचे अध्यक्ष प्रमोद आडकर आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आयच्या प्रवक्तत्या उत्कर्षा रुखवते यांनीही थोडक्यात मनोगत व्यक्त केले.

वाडिया महाविद्यालय येथील महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी लताताई दयाराम राजगुरु यांच्या वाढदिवसाचे आैचित्य साधून गरजू महिलांना शंभर शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. तसेच रुग्णवाहिकेचे लोकार्पण देखील मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.

विठ्ठल गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सुत्रसचंलन केले. कुणाल दयाराम राजगुरु यांनी प्रास्ताविक केले तर प्रेरणा विठ्ठल गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading